व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर शाळेत सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प, महाराष्ट्र दिनी उद्घाटन । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरामध्ये 1 मे अर्थात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 2, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Ad-P-V-Paranjpe-Vidya-Mandir-Talegaon-Dabhade

Photo Courtesy : Prabhakar Tumkar


तळेगाव दाभाडे येथील ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरामध्ये 1 मे अर्थात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच यावेळी शिक्षण महर्षी, मावळ भूषण कृष्णराव भेगडे यांच्या मार्गदर्शनातून ॲड. पु. वा परांजपे विद्या मंदिरात सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवण्यात आला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

1 मे निमित्त ध्वजारोहण आणि सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन संस्थेचे सचिव संतोष खांडगे, शाळेचे माजी विद्यार्थी अविनाश बवरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार शेलार, संस्थेचे संचालक महेश शहा, दामोदर शिंदे, सोनबा गोपाळे, शालेय समिती सदस्य अशोक काळोखे, आनंद भेगडे, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर तुमकर, माजी विद्यार्थी अंकुश गुंड, दीपक अवसरकर उपस्थित होते. दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मोगऱ्याची रोपे देऊन सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. (  Inauguration of Solar Power Generation Project at Ad P V Paranjpe Vidya Mandir Talegaon Dabhade )

प्रमुख अतिथी माजी विद्यार्थी अविनाश बवरे यांनी आपल्या मनोगतात सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे. तसेच माजी विद्यार्थी या नात्याने सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्याची व ध्वजारोहण करण्याची संधी दिली, त्याबद्दल आनंद व्यक्त केला. संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला, तसेच 1 मे आणि अमृत महोत्सवी वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे सहसचिव व शालेय समिती अध्यक्ष यांनी देखील सर्वांना 1 मे च्या शुभेच्छा दिल्या आणि लवकरच अमृत महोत्सव कार्यक्रम साजरा होणार आहे, याबद्दल माहिती दिली. शालेय समितीचे सदस्य अशोक काळोखे यांनी कामगार दिनाच्या सर्व अध्यापकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी केले. तर आभार पर्यवेक्षक पांडुरंग कापरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ अध्यापिका अनिता नागपुरे यांनी केले.

अधिक वाचा –
– महाराष्ट्र दिनासह कामगार दिनाचे औचित्य साधून वडगाव मावळ इथे श्रमिक कामगार संघटनेची स्थापना
– मावळमधील पहिला ‘आपला दवाखाना’ तळेगावमध्ये सुरु, बाळा भेगडेंच्या हस्ते उद्घाटन, मुख्यमंत्र्यांकडून ऑनलाईन शुभारंभ


dainik maval jahirat

Previous Post

महाराष्ट्र दिनासह कामगार दिनाचे औचित्य साधून वडगाव मावळ इथे श्रमिक कामगार संघटनेची स्थापना

Next Post

मोठा निर्णय : “मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय”, शरद पवार यांची मोठी घोषणा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sharad-Pawar

मोठा निर्णय : "मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय", शरद पवार यांची मोठी घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Prompt action by Kamshet police Four missing minors located within just three hours Maval Crime

कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन

October 23, 2026
Water-shut-off

वडगाव मावळमध्ये शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ; पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय

October 23, 2026
Demand to declare drought in Maval taluka and provide compensation of Rs 50000 per hectare to farmers

मावळ तालुक्यात दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी

October 23, 2026
Do not respond to defamatory posts about party leadership NCP Maval Ganesh Khandge

पक्ष नेतृत्वाच्या बदनामीकारक पोस्टना प्रतिक्रिया देऊ नये ; “सोशल मीडियावर निरर्थक वाद नको” – गणेश खांडगे

October 21, 2026
MLA Sunil Shelke has decided not to celebrate his birthday following sad demise of late Ajit pawar

स्व. अजितदादांच्या दुःखद निधनामुळे आमदार सुनील शेळके यांच्याकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

October 19, 2026
Flood-affected citizens in Lonavala will receive government financial aid before Diwali

लोणावळ्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदतीचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा!

October 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.