महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद सोडणार असल्याचे म्हटले आहे. “मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय” असे त्यांनी कार्यक्रमात बोलताना जाहीररित्या सांगितले. ( Sharad Pawar announces resignation as NCP chief )
शरद पवार यांनी म्हटलं की, गेल्या सहा दशकात महाराष्ट्राने मला खंबीर साथ आणि प्रेम दिलं. मी हे विसरू शकत नाही. मात्र यापुढे पक्ष संघटनेसंदर्भात पुढील दिशा ठरवणं आवश्यक वाटतं. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँघ्रेस पक्षातली सदस्यांची समिती स्थापन करावी.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
समितीमध्ये कोण सदस्य असावेत त्यांची नावेही शरद पवार यांनी सुचवली. प्रफुल्ल पटले, सुनील तटकरे, केके शर्मा, पीसी चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड या नावांचा समावेश आहे. या नेत्यांची समिती अध्यक्षपदाच्या निवडीचा निर्णय घेईल. त्यासोबतच पक्ष संघटना वाढीसाठी आणि पक्षाची विचारधारा, ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, जनसेवेसाठी सातत्याने प्रयत्न करतील असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा –
– ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर शाळेत सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प, महाराष्ट्र दिनी उद्घाटन । Talegaon Dabhade
– महाराष्ट्र दिनासह कामगार दिनाचे औचित्य साधून वडगाव मावळ इथे श्रमिक कामगार संघटनेची स्थापना