स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक बाळासाहेब गायकवाड यांचे आज (बुधवार, दिनांक 3 मे) रोजी दुःखद निधन झाले. पहाटे हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आकस्मिक निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
बाळासाहेब गायकवाड हे एसआरपीचे अध्यक्ष रमेश साळवे यांचे अत्यंत खास व्यक्ती होते. तसेच पक्षात त्यांचे स्थान अत्यंत वरचे होते. मावळ तालुक्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे मावळ तालुकाध्यक्ष पदही त्यांनी भुषवले होते, तसेच ते एसआरपीचे केंद्रीय सदस्य होते. गोवित्री वेल्हवळी सोसायटीचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले. यासह सध्या संत तुकाराम सहकारी कारखानाचे विद्यमान संचालक म्हणून कार्यरत होते.
बाळासाहेब गायकवाड यांच्यावर आज कामशेत इथे इंद्रायणी नदीकाठी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. ( Swabhimani Republican Party Leader Balasaheb Gaikwad Death due to heart attack )
अधिक वाचा –
– कामशेत इथे इंद्रायणी नदीत बुडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, आपदा मित्रांकडून मृतदेह पाण्याबाहेर
– कार्यकर्ते म्हणाले “ताईंना बोलुद्या” पण अजितदादा म्हणाले “सुप्रिया तू बोलू नको” । Sharad Pawar Announce Retirement