कामशेत इथे इंद्रायणी नदी पात्रात बुडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि आपदा मित्र मावळ यांनी सदर व्यक्तीचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे.
सदर व्यक्तीच्या मृत्यूबद्दल कामशेत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ( an unknown person died after drowning in Indrayani river in Kamshet )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर अनोळखी इसम याचे अंदाजे वय 40 वर्ष आहे. त्याच्या छातीवर डाव्या बाजूस बदामामध्ये V असे गोंदलेले आहे. तसेच दोन्ही हातावर गोंदलेले आहे. तो इंद्रायणी नदीत बुडालेल्या अवस्थेत मिळून आला असून तो मयत झाला आहे. त्याची ओळख पटल्यास कामशेत पोलिस स्टेशनशी संपर्क करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि आपदा मित्र मावळ यांची टीम सागर कुंभार, गणेश फाळके, सोन्या वाडेकर, शिर्के आनंद, अनिल आंद्रे यांनी सदर मृतदेह पाण्याबाहेर काढला.
अधिक वाचा –
– शरद पवारांची निवृत्तीची घोषणा अन् जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना अश्रू अनावर!
– महाराष्ट्र दिनासह कामगार दिनाचे औचित्य साधून वडगाव मावळ इथे श्रमिक कामगार संघटनेची स्थापना