तळेगाव दाभाडे शहर भाजपा कामगार आघाडीच्या वतीने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त तळेगांव दाभाडे नगरपरिषदेच्या सर्व सफाई कर्मचारी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व सफाई कर्मचारी यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला आणि महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे, तळेगांव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील, माजी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, माजी नगराध्यक्ष रविंद्र दाभाडे, तळेगांव दाभाडे शहर भाजपा अध्यक्ष रविंद्र माने, माजी नगरसेविका शोभा भेगडे, भाजपा सभागृह नेते अरुण भेगडे, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे सचिव संतोष दाभाडे, सरचिटणीस शोभा परदेशी, माजी नगरसेवक सचिनभाऊ टकले, पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष अशोकराव काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमावेळी स्वागत व प्रास्ताविक तळेगांव दाभाडे शहर भाजपा कामगार आघाडीचे अध्यक्ष अशोक दाभाडे यांनी केले. आभार तळेगांव दाभाडे शहर भाजपा कामगार आघाडीचे कार्याध्यक्ष स्वप्निल भेगडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तळेगांव दाभाडे शहर भाजपा कामगार आघाडीचे सरचिटणीस आनंद पुर्णपात्रे, योगेश पाटील,अतिश रावळे, उपाध्यक्ष सतिश पारगे, अनिल शेलार, तुकाराम आखाडे, प्रसिद्धी प्रमुख नामदेव मदने, संजय पवार, सदस्य भास्कर रेड्डी, राजेंद्र डांगे, माऊली गुंड, रोहिदास गायकवाड, संकेत ओसवाल, यांनी योगदान दिले.
तळेगांव दाभाडे नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी वर्ग, तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीचे सर्व आजी/माजी/ पदाधिकारी, सर्व सफाई कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध आघाडीचे/मोर्चाचे अध्यक्ष व पदाधिकारी, उपस्थित होते. ( on 1st may maharashtra day all sanitation workers of talegaon dabhade city honored by bjp workers alliance )
अधिक वाचा –
– कार्यकर्ते म्हणाले “ताईंना बोलुद्या” पण अजितदादा म्हणाले “सुप्रिया तू बोलू नको” । Sharad Pawar Announce Retirement
– कामशेत इथे इंद्रायणी नदीत बुडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, आपदा मित्रांकडून मृतदेह पाण्याबाहेर