पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से टोलनाक्यापासून यापुढे जड वाहने आणि पर्यटन गाड्यांना लेन कटिंग करु देवू नये. वाहतूक विभागाच्या पोलिसांनी रस्त्यावर उभे राहून संचलन करावे. 8 दिवसात दिशादर्शक फलक, बॅरिकेट्स, रस्ते दुरुस्त करण्याच्या सूचना मावळचे शिवसेना खासदार, केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सातत्याने अपघात होत असल्याने खासदार बारणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची आज (गुरुवारी) बैठक घेतली. त्यानंतर महामार्गावरील ‘ब्लॅक स्पॉट’, खंडाळा येथील रस्त्याची अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी केली. यावेळी बारणे यांनी अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
वाहतूक विभागाचे पोलीस उपअधिक्षक तानाजी चिखले, एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता सुर्ती नाईक, राकेश सोनवणे, पीडब्ल्यूडीचे उपअभियंता धनराज दराडे, एनएचआयचे कार्यकारी अभियंता यशवंत घोटकर, आरआयबीचे जयंत डांगरे, मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, लोणावळ्याचे मुख्याधिकारी पंडीत पाटील, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, सुर्यकांत वाघमारे, निलेश तरस, विशाल हुलावळे, मुन्ना मोरे यावेळी उपस्थित होते. ( MP Shrirang Barne inspected black spot on Pune Mumbai Expressway at khandala lonavala )
खासदार बारणे म्हणाले, महामार्गावर सातत्याने होणारे अपघात चिंताजनक आहेत. त्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. बस दरीत पडली होती. तिथे कठडा बसविण्यात आला आहे. मोठी वाहने जाऊ नयेत यासाठी बूम बसविले आहेत. यापुढे टोलनाक्यापासून जड वाहने आणि पर्यटन गाड्यांना लेन कटिंग करु देवू नये. वाहतूक विभागाच्या पोलिसांनी रस्त्यावर उभे राहून संचलन करावे. जेणेकरुन वाहनचालकांना शिस्त लागेल. अर्धवट कामे येत्या 8 दिवसात पूर्ण कराव्यात. दिशादर्शक फलक, बॅरिकेट्स, रस्ते दुरुस्त करावेत.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघात टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत आज बैठक घेऊन सातत्याने होणाऱ्या अपघात स्थळाची पहाणी केली वाहातूक विभागाचे DYSP तानाजी चिखले,MSRDC कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे RIB चे जयंत डांगरे उपस्थित होते.@mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/3bLrf1iPGC
— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) May 4, 2023
टनेलमध्ये वीजेची सोय नाही. तिथे वीज दिवे बसवावेत. अपघात टाळण्यासाठी प्रयत्न केले जातील. जड वाहतूक करणाऱ्या ट्रकने लेन कटिंग केल्यास दंड आकारण्यात यावा. घाटात अधिकचे कर्मचारी वाढवावेत. ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित केले आहेत. त्या जागेवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील ‘जल जीवन मिशन’ अंतर्गतची कामे मिशन मोडवर पूर्ण करा – जिल्हाधिकारी
– पुणे रेल्वे स्टेशन बाल स्नेही कक्षाचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा, दोन मान्यवरांना ‘विशेष सामाजिक कार्य पुरस्कार’