राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बुधवार (दिनांक 17 मे) रोजी पार पडली. या बैठकीत पक्षांतर्गत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्यावर पुणे विभागाची जबाबदारी दिल्याने आमदार शेळके यांचे पक्षांतर्गत स्थान अधिक बळकट झाल्याचे दिसून आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी माध्यमांशी संवाद साधून पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीसंदर्भात माहिती दिली. ‘बैठकीत पक्षसंघटनेबाबत चर्चा करण्यात आली. तसेच पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल,’ अशी माहिती दिली. यासाठी पक्षांतर्गत राज्य निवडणूक अधिकारी म्हणून जयप्रकाश दांडेगावकर तसेच मुंबई विभागीय निवडणूक अधिकारी म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी निवड जाहीर करण्यात आली. ( NCP Party Gave Pune Division Responsible To Maval Taluka MLA Sunil Shelke )
यासह बूथ कमिट्या बळकट करण्यासाठी पक्षाच्या काही लोकांवर जबाबदारी देण्यात आली असून त्यांची नावे जाहीर करण्यात आली. यात,
विदर्भ, नागपूर विभाग – अनिल देशमुख व मनोहर चंद्रिकापुरे
विदर्भ, अमरावती विभाग – राजेंद्र शिंगणे व अमोल मिटकरी
कोकण विभाग – जितेंद्र आव्हाड व सुनिल भुसारा
मराठवाडा विभाग – धनंजय मुंडे, विक्रम काळे आणि सतिश चव्हाण
पश्चिम महाराष्ट्र विभाग – शशिकांत शिंदे व अरुण लाड
पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे) – सुनिल शेळके व चेतन तुपे
पश्चिम महाराष्ट्र विभाग (सोलापूर) – अशोक पवार व चेतन तुपे
खान्देश विभाग – अनिल पाटील व एकनाथराव खडसे
कोकण विभाग – अनिकेत तटकरे व शेखर निकम
यांच्यावर जबाबदारी सोपावण्यात आली आहे.
सुनिल शेळकेंचे पक्षात वजन वाढतंय…
भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीच्या तिकीटावर मावळ विधानसभेचे आमदार झालेले सुनिल शेळके यांचे पक्षांतर्गत वजन चांगलेच वाढताना दिसत आहे. अजित पवार यांचे खास जवळचे आणि विश्वासू आमदार म्हणून सुनिल शेळके हे आता महाराष्ट्राला परिचित आहेत. तसेच तत्कालीन मंत्री बाळा भेगडे यांचा पराभव केल्याने सुनिल शेळके यांचे नाव तेव्हाही राज्यभर पोहोचले होते. त्यानंतर आतापर्यंत शेळके यांनी पुणे जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठ्या निवडणूकात पक्षासाठी चांगले काम केले, त्यामुळे पक्ष नेतृत्वाचा त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ होताना दिसत आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा बैलगाडा शर्यतींना हिरवा कंदील । Bailgada Sharyat News
– नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठा बदल! कायदा मंत्री किरेन रिजिजू यांची हकालपट्टी, ‘हे’ असणार नवीन कायदा मंत्री
– ‘किशोर आवारे हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या’; तळेगाव दाभाडे शहरात भव्य मोर्चा । Kishor Aware Murder Case