व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठा बदल! कायदा मंत्री किरेन रिजिजू यांची हकालपट्टी, ‘हे’ असणार नवीन कायदा मंत्री

केंद्रीय राजकारणातून एक मोठी माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 18, 2023
in देश-विदेश
narendra-modi-amit-shah

File Image


केंद्रीय राजकारणातून एक मोठी माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. देशाच्या सध्याचे केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अर्जून राम मेघवाल यांची कायदा मंत्री म्हणून वर्णी लागलेली आहे. ( Arjun Ram Meghwal replaces Kiren Rijiju as the Law Minister Rijijiu assigned Ministry of Earth Sciences )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

रिजिजूंना ते विधान भोवलं?

किरेन रिजिजू यांनी मागील काही दिवसांपूर्वी न्यायमूर्ती आणि कॉलेजियम व्यवस्थेविरुद्ध केलेली वक्तव्ये यामुळे मोदी सरकारला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला होता. त्यांची हीच वक्तव्ये त्यांना भोवली असून त्यामुळेच त्यांना कायदा मंत्री पदावरुन दूर केल्याचे बोलले जात आहे.

Arjun Ram Meghwal replaces Kiren Rijiju as the Law Minister. Rijijiu assigned the Ministry of Earth Sciences pic.twitter.com/0chlEZG9un

— ANI (@ANI) May 18, 2023

Kiren Rijiju :
Not Law
Now Minister for Earth Sciences

Not easy to understand the science behind the Laws

Now will try to grapple with the laws of science

Good luck my friend !

— Kapil Sibal (@KapilSibal) May 18, 2023

मेघवाल यांच्या नियुक्तीमागे राजकीय गणिते?

दुसरीकडे रिजिजू यांच्या जागी अर्जून राम मेघवाल यांची नियुक्ती केल्याने या बदलामागे काही राजकीय गणित असल्याचेही बोलले जात आहे. याचे कारण अर्जुनराम मेघवाल हे राजस्थानमधील एक मोठे नेते म्हणून परिचित आहेत. त्यामुळे राजस्थानच्या येत्या निवडणुकीच्या तोंडावर हा बदल केल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगत आहे.

अर्जुन राम मेघवाल हे सध्या संसदीय कार्य आणि सांस्कृतिक मंत्री आहेत. त्यांच्याकडे आता कायदा आणि न्याय विभागाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. तर, किरेन रिजिजू यांच्याकडे भूविज्ञान मंत्रालयाचा पोर्टफोलिओ सोपवला जाईल, असी माहिती राष्ट्रपती भवनकडून देण्यात आली आहे.

अधिक वाचा –
– आयटीआय कंत्राटी निदेशकांच्या मानधनात भरीव वाढ, आता मिळणार 25 हजार रुपये मानधन, शिंदे सरकारचा निर्णय!!
– ‘किशोर आवारे हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या’; तळेगाव दाभाडे शहरात भव्य मोर्चा । Kishor Aware Murder Case


dainik maval jahirat

Previous Post

‘किशोर आवारे हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या’; तळेगाव दाभाडे शहरात भव्य मोर्चा । Kishor Aware Murder Case

Next Post

मोठी बातमी! बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा बैलगाडा शर्यतींना हिरवा कंदील । Bailgada Sharyat News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Bailgada-Sharyat-Bullock-Cart-Races

मोठी बातमी! बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा बैलगाडा शर्यतींना हिरवा कंदील । Bailgada Sharyat News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.