व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात विकास कामांचा धडाका!! खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते तीन कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या यांच्या प्रयत्नातून मावळ तालुक्यातील विविध गावासाठी जिल्हा वार्षिक नियोजना अंतर्गत तीन कोटी रूपयांची विविध विकास कामे सुरु केली गेली आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 18, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Development-Works-Bhoomi-Pujan

Photo Courtesy : Twitter / MP Shrirang Barne


मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या यांच्या प्रयत्नातून मावळ तालुक्यातील विविध गावासाठी जिल्हा वार्षिक नियोजना अंतर्गत तीन कोटी रूपयांची विविध विकास कामे सुरु केली गेली आहेत. साते, कान्हे, कामशेत, टाकवे, कार्ला, मळवली, पाटण येथील गावांमध्ये विकास कामांचे भूमिपूजन खासदार बारणे यांच्या हस्ते बुधवारी (दिनांक 17 मे) करण्यात आले. खासदार बारणे यांनी सर्वाधिक निधी मावळसाठी दिला असून विकासकामांचा धडाका सुरु आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, पंचायत समितीचे माजी सभापती गुलाब म्हाळसकर, अंकुश देशमुख, सुनील हगवणे, प्रवीण चव्हाण, सुनील मोरे, विशाल हुलावळे, दिपक हुलावळे, सागर हुलावळे, धनंजय नवघणे, गिरीष सातकर, डॅा. विकेश मुथा, दत्ता केदारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे. डी. पाटील, साते गावच्या सरपंच आरती आगळमे, कान्हे गावचे सरपंच विजय सातकर, टाकवे गावचे सरपंच राकेश डमाले, मळवली गावचे सरपंच अस्लम शेख, पाटण गावचे सरपंच प्रवीण तिकोने, कामशेतचे उपसरपंच दत्ता रावते उपस्थित होते. ( MP Shrirang Barane Completed Bhoomi pujan Of Various Development Works In Villages of Maval Taluka )

खासदार श्रीरंग बारणे यांचे मावळ तालुक्यावर विशेष लक्ष असल्याचे दिसत आहे. मावळ तालुका वाड्या वस्त्यांमध्ये विस्तारला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये दळणवळणासाठी रस्त्यांचा अभाव आहे. अंतर्गत रस्ते नाहीत. त्याकरिता खासदार बारणे यांनी जिल्हा वार्षिक निधीतून मावळ तालुक्यात तीन कोटींचा निधी मंजूर करुन घेतला. या विकास निधीतून अंतर्गत रस्ते, समाज मंदिराच्या कामांचे भूमीपूजन करण्यात आले. खासदार बारणे यांनी मावळ तालुक्याला सर्वाधिक निधी दिला आहे.

माझ्या प्रयत्नांतून मावळ तालुक्यातील विविध गावांसाठी जिल्हा वार्षीक नियोजन अंतर्गत ३ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामधील साते, कान्हे, कामशेत, टाकवे, कार्ला, मळवली, पाटण या गावातील विकास कामांचा आज भूमिपूजन समारंभ पार पाडला.
याप्रसंगी माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, शरद… pic.twitter.com/OOWdGD12Va

— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) May 17, 2023

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “मावळातील गावांमध्ये रस्ते करण्यावर लक्ष्य केंद्रित केले आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार मावळातील अनेक गावांमधील अंतर्गत रस्ते करण्यास प्राधान्य दिले. केंद्र, राज्य स्तरीय रस्त्यांच्या कामासाठी मोठा निधी आणला आहे. त्यातून गावांमध्ये रस्त्यांची कामे केली जात आहेत. गावपातळीवर राजकारणविरहित कामे केली जात आहेत. गावातील विकासांमध्ये राजकारण आणले जात नाही. सरपंच कोणत्या पक्षाचा आहे हे बघितले जात नाही. सर्व गावांना विकासासाठी समान निधी दिला जात आहे. ग्रामपंचायतीमधील सर्वांनी राजकारणापेक्षा एकत्र येवून गावाचा विकास करण्यावर भर द्यावा. गावपतळीवर राजकारण विरहित काम करावे. त्यामुळे गावाच्या विकासाला अधिक चालना मिळेल,” असे मार्गदर्शनही त्यांनी केले.

अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुनिल शेळकेंचे वजन वाढतंय..! आमदार शेळकेंवर पक्षाकडून पुन्हा मोठी जबाबदारी, जाणून घ्या
– मोठी बातमी! बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा बैलगाडा शर्यतींना हिरवा कंदील । Bailgada Sharyat News
– नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठा बदल! कायदा मंत्री किरेन रिजिजू यांची हकालपट्टी, ‘हे’ असणार नवीन कायदा मंत्री


dainik maval jahirat

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुनिल शेळकेंचे वजन वाढतंय..! आमदार शेळकेंवर पक्षाकडून पुन्हा मोठी जबाबदारी, जाणून घ्या

Next Post

अखेर कुणे गावाजवळील ‘त्या’ पुलाचा तुटलेला सुरक्षा कठडा प्रशासनाने बांधला, नागरिकांकडून समाधान व्यक्त

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
bridge-safety-wall-construction

अखेर कुणे गावाजवळील 'त्या' पुलाचा तुटलेला सुरक्षा कठडा प्रशासनाने बांधला, नागरिकांकडून समाधान व्यक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.