व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अखेर कुणे गावाजवळील ‘त्या’ पुलाचा तुटलेला सुरक्षा कठडा प्रशासनाने बांधला, नागरिकांकडून समाधान व्यक्त

तीव्र वळणावर हा पूल असून कठडा तुटल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 18, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
bridge-safety-wall-construction

Photo Courtesy : Chandrakant Asawale


टाकवे बुद्रुक (प्रतिनिधी) : सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील आंदर मावळ येथील कुणे गावाजवळील नागमोडी वळणावर दोन्ही बाजूंनी तीव्र उतार असणाऱ्या रस्त्यावरील पुलाच्या सुरक्षा कठड्याला अज्ञात वाहनाने मागील महिन्यामध्ये धडक दिली होती. परिणामी पूलाचा एका बाजूचा कठडा तुटला होता. तीव्र वळणावर हा पूल असून कठडा तुटल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. ( kune village bridge safety wall construction completed andar maval )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

अनेक माध्यमांत याबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. तसेच टीम दैनिक मावळनेही याचा पाठपुरावा केला होता. अखेर माध्यमांच्या रेट्याची आणि नागरिकांच्या मागणीची दखल घेत प्रशासनाने हा कठडा बांधून पूर्ण केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी खंडू आगळमे, जालिंदर मेठल, दामू करवंदे, राघुजी तळपे, रामदास काठे, आमदार सुनिल शेळके यांचे सहकारी नारायण मालपोटे, माजी उपसरपंच बाळासाहेब खंडागळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नारायण ठाकर, टाकवे नाणे जिल्हा परिषद गट भाजपा अध्यक्ष रोहिदास असवले आदींनी त्या ठिकाणी जाणून पाहणी केली होती. त्यानंतर पुलाची परिस्थिती पाहून अखेर सुरक्षा कठडा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग वडगाव मावळ यांच्याकडून सदर पुलावरील तुटलेल्या सुरक्षा कठड्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

दरम्यान पूर्ण झालेल्या कामामुळे या भागातून नेहमी ये-जा करणाऱ्या शेकडो प्रवाशांना, स्थानिक नागरिक आदींना यामुळे दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी माध्यमे आणि लोकप्रतिनिधी, अधिकारी यांचे आभार मानले असून समाधान व्यक्त केले आहे.

अधिक वाचा –
– मावळात विकास कामांचा धडाका!! खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते तीन कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुनिल शेळकेंचे वजन वाढतंय..! आमदार शेळकेंवर पक्षाकडून पुन्हा मोठी जबाबदारी, जाणून घ्या


Previous Post

मावळात विकास कामांचा धडाका!! खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते तीन कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

Next Post

कातवी गावातील ‘पहिली महिला पोलिस’ बनली ‘क्षितिजा चव्हाण’, मावळकन्येवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kshitija-Chavan-Katavi-Maval-In- Police

कातवी गावातील 'पहिली महिला पोलिस' बनली 'क्षितिजा चव्हाण', मावळकन्येवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde inspected work of Mumbai Pune Missing Link

बोरघाट, खंडाळा घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक ; वेगवान व सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती

April 27, 2026
Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.