मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवारी (दिनांक 19 मे) बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीत पवना धरणग्रस्तांना पवना धरण परिसरात दोन एकर आणि जिल्ह्यात दोन एकर जमीन देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. ( Pavana dam victims will get four acres of land each )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पवना धरण प्रकल्पातील 340 बाधित खातेदारांचे पुनर्वसन करण्यात आले होते. परंतु उर्वरित अनेक खातेदार मागील अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत होते. या संदर्भात मागील चार वर्षांपासून मंत्रालय स्तरावर अनेकदा विभागनिहाय बैठका घेत आमदार सुनिल शेळके यांनी याचा पाठपुरावा केला होता. तसेच विधानसभेत देखील याविषयी आवाज उठविला होता. तसेच माजी आमदार बाळा भेगडे यांनी त्यांच्या कार्यकाळात यासाठी प्रयत्न केले होते.
मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी सर्व शेतकऱ्यांनी पवना धरणाचे पाणी रोखून एकदिवसीय आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान लवकरच बैठक घेऊन धरणग्रस्तांना न्याय देऊ, असा शब्द प्रशासनाकडून मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्या अनुषंगाने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्व खातेदारांना प्रत्येकी चार एकर जमीन वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळाल्याचे समाधान आहे.
या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके, माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, जिल्हाधिकारी राजेशजी देशमुख, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन गितांज शिर्के, अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे, अधिक्षक अभियंता सौ जगताप, पिंपरी चिंचवड आयुक्त शेखर सिंह, पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता विजय पाटील, उपअभियंता अशोक शेटे, शाखा अभियंता अहिरे, उपविभागीय अधिकारी मावळ बागडे, तहसीलदार विक्रम देशमुख, पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मावळ तालुका पुन्हा हादरला! 54 वर्षीय व्यक्तीचा कान्हे गावात निर्घृण खून
– पावसाळ्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्तीची कामे पूर्ण करा – बाळा भेगडे