व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 17, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अखेर न्याय मिळालाच..! पवना धरणग्रस्त‍ांसाठी आनंदाची बातमी, बाधित शेतकर्‍यांना प्रत्येकी चार एकर जमीन मिळणार

पवना धरण प्रकल्पातील 340 बाधित खातेदारांचे पुनर्वसन करण्यात आले होते. परंतु उर्वरित अनेक खातेदार मागील अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 20, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Pavana-dam-victims

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवारी (दिनांक 19 मे) बैठक संपन्न झाली.

nakshtra ads may 2025

सदर बैठकीत पवना धरणग्रस्तांना पवना धरण परिसरात दोन एकर आणि जिल्ह्यात दोन एकर जमीन देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. ( Pavana dam victims will get four acres of land each )

tata tiago ads may 2025

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पवना धरण प्रकल्पातील 340 बाधित खातेदारांचे पुनर्वसन करण्यात आले होते. परंतु उर्वरित अनेक खातेदार मागील अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत होते. या संदर्भात मागील चार वर्षांपासून मंत्रालय स्तरावर अनेकदा विभागनिहाय बैठका घेत आमदार सुनिल शेळके यांनी याचा पाठपुरावा केला होता. तसेच विधानसभेत देखील याविषयी आवाज उठविला होता. तसेच माजी आमदार बाळा भेगडे यांनी त्यांच्या कार्यकाळात यासाठी प्रयत्न केले होते.

मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी सर्व शेतकऱ्यांनी पवना धरणाचे पाणी रोखून एकदिवसीय आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान लवकरच बैठक घेऊन धरणग्रस्तांना न्याय देऊ, असा शब्द प्रशासनाकडून मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्या अनुषंगाने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्व खातेदारांना प्रत्येकी चार एकर जमीन वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळाल्याचे समाधान आहे.

या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके, माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, जिल्हाधिकारी राजेशजी देशमुख, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन गितांज शिर्के, अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे, अधिक्षक अभियंता सौ जगताप, पिंपरी चिंचवड आयुक्त शेखर सिंह, पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता विजय पाटील, उपअभियंता अशोक शेटे, शाखा अभियंता अहिरे, उपविभागीय अधिकारी मावळ बागडे, तहसीलदार विक्रम देशमुख, पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मावळ तालुका पुन्हा हादरला! 54 वर्षीय व्यक्तीचा कान्हे गावात निर्घृण खून
– पावसाळ्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्तीची कामे पूर्ण करा – बाळा भेगडे


dainik maval ads may 2025

Previous Post

मावळ तालुका पुन्हा हादरला! 54 वर्षीय व्यक्तीचा कान्हे गावात निर्घृण खून

Next Post

आढले खुर्द ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपाचे महेंद्र भोईर विजयी! विरोधी उमेदवाराचा ‘इतक्या’ मतांनी पराभव

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
BJP-Mahendra-Bhoir-maval

आढले खुर्द ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपाचे महेंद्र भोईर विजयी! विरोधी उमेदवाराचा 'इतक्या' मतांनी पराभव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Letter to Nagar Parishad CEO regarding roads Condition in Talegaon Station area

तळेगाव दाभाडे : ‘जसा आहे तसा रस्ता करून द्या, अन्यथा ठेकेदारावर गुन्हा दाखल करा’ । Talegaon Dabhade

May 16, 2025
Agricultural assistants in Maval taluka on indefinite strike read what are the demands

मावळ तालुक्यातील कृषि सहाय्यक बेमुदत संपावर, वाचा काय आहेत मागण्या ? । Maval News

May 16, 2025
Kanhe Upazila Hospital

गुडन्यूज ! मावळ तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा ; कान्हे उपजिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध

May 16, 2025
ration-card

भटके विमुक्त समाजाला राज्यात कोठेही रेशनिंग ; जात प्रमाणपत्र आणि आधारकार्डही देण्याचा महत्त्वाचा निर्णय

May 16, 2025
transfer image clip art

ऐतिहासिक निर्णय : पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या ; इच्छित स्थळी सहजतेने बदली झाल्याने अधिकारी खूश

May 16, 2025
Mahabuddha Vandana in Karla Caves on occasion of Buddha Purnima

कार्ला लेणी येथे २५६९ व्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त हजारोंच्या उपस्थितीत ‘महाबुद्धवंदना’ संपन्न । Karla News

May 16, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.