पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शाळा सुधार आणि अंगणवाडी विकासाठी 37 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. असे असताना देखील अद्याप जिल्ह्यात एकही कामाची निविदा प्रक्रिया झालेली नाही, ही बाब बाळा भेगडे यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या शुक्रवारी (दिनांक 19 मे) झालेल्या बैठकीत निदर्शनास आणून दिली. तसेच पावसाळ्यापूर्वी शाळा वर्गखोल्यांचे काम पूर्ण करावे, अशी मागणी देखील त्यांनी केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर बैठकीला खासदार शरद पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख तसेच खासदार, आमदार, जिल्हा नियोजन सदस्य, अधिकारी वर्ग उपस्थित होते. ( Pune District Planning Meeting 2023 Sharad Pawar Chandrakant Patil Ajit Pawar present )
अधिक वाचा –
– स्वत:ला कट्टर शिवभक्त म्हणवून घेणारे बाबाराजे देशमुख यांना खंडणी प्रकरणात अटक । BabaRaje Deshmukh Arrest
– अपघात ब्रेकिंग! उर्से टोलनाक्याजवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, मुलीचा जागीच मृत्यू