व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, April 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्वत:ला कट्टर शिवभक्त म्हणवून घेणारे बाबाराजे देशमुख यांना खंडणी प्रकरणात अटक । BabaRaje Deshmukh Arrest

समाजमाध्यमांत आपल्या खळबळजनक वक्तव्यांनी सतत चर्चेत राहणारे प्रशांत उर्फ बाबाराजे गणपतराव देशमुख यांना अटक करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 19, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
BabaRaje-Deshmukh

Photo Courtesy : IG / BabaRaje Deshmukh


समाजमाध्यमांत आपल्या खळबळजनक वक्तव्यांनी सतत चर्चेत राहणारे प्रशांत उर्फ बाबाराजे गणपतराव देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्वतःच्या जमीन व्यवहारात फसवणूक, खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती समोर येत आहे. सन 2013 ते नोव्हेंबर 2020 दरम्यान बेबडओहोळ (ता. मावळ) इथे हा व्यवहार सुरू होता. बुधवारी (दिनांक 17 मे) रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

रवींद्र शिवाजीराव देशमुख (वय 48, रा. वडगाव बुद्रुक, ता. हवेली जि. पुणे) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर प्रशांत उर्फ बाबाराजे गणपतराव देशमुख (वय 33, रा. बेबडओहोळ, ता. मावळ) याना अटक करण्यात आली आहे. ( Maval Taluka BabaRaje Deshmukh Arrested In Fraud And Extortion Case )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबाराजे देशमुख यांनी त्यांची गट नंबर 196 बेबडओहोळ (ता. मावळ) याठिकाणी असणारी 5 एकर मिळकत वनीकरण विभागात समाविष्ट असल्याने त्या मिळकतीचे प्लॉटींग होत नाही, याबाबत माहिती असून सुद्धा त्या मिळकती मधील 25 गुंठे जागेचा फिर्यादीशी व्यवहार केला. त्याचा मोबदला म्हणुन 25 लाख रुपये रक्कम फिर्यादीकडुन घेतली. त्या जागेचे फिर्यादीचे नावाने खरेदीखत करुन न देता, तसेच फिर्यादीकडून घेतलेले 25 लाख रुपये फिर्यादीस परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली. तसेच खरेदीखत करायचे असल्यास आणखी 70 लाख रुपयांच्या खंडणी मागितली. पैसे न दिल्यास अथवा पोलीसांकडे तक्रार केल्यास फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी देवून, 5 लाख रुपये रक्कम खंडणी म्हणून घेतली आहे, असे फिर्यादीत नमुद आहे. शिरगाव पोलीसचे पोलिस उपनिरिक्षक कांबळे हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

अधिक वाचा –
– धक्कादायक! पवनानगर येथील महावितरण कर्मचाऱ्याचा धामणदरा इथे काम करताना विजेच्या धक्क्याने मृत्यू
– अपघात ब्रेकिंग! उर्से टोलनाक्याजवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, मुलीचा जागीच मृत्यू


Previous Post

धक्कादायक! पवनानगर येथील महावितरण कर्मचाऱ्याचा धामणदरा इथे काम करताना विजेच्या धक्क्याने मृत्यू

Next Post

पावसाळ्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्तीची कामे पूर्ण करा – बाळा भेगडे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
bala-bhegade

पावसाळ्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्तीची कामे पूर्ण करा - बाळा भेगडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
Crime

गांजा विक्री प्रकरणी ५६ वर्षीय व्यक्तीला अटक ; नवलाख उंब्रे – बधलवाडी रोडवरील मंदिराजवळून घेतले ताब्यात

April 26, 2026
Work to remove silt from Pawana Dam begins Initiative under MP Shrirang Barne Maval

पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

April 26, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

April 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.