लिफ्ट देण्याच्या बहाण्याने युवतीला निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जात तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना लोणावळा शहर हद्दीत घडली. शनिवार (दिनांक 20 मे) रोजी घडलेल्या या प्रकाराबद्दल रात्री उशीरा लोणावळा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला, तसेच पोलिसांनी तत्काळ तपास करत रविवारी (दिनांक 21 मे) आरोपीला अटक केली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक 20 वर्षीय युवती शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास रायवूड भागातून घरी जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेला तरुण वैभव साठे (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) याने तिला लिफ्ट दिली. मात्र पुढे निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवून तिच्या एकटेपणाचा फायदा घेत ते लगट करण्याचा प्रयत्न करू लागला, तसेच मुलीचा हात पकडून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, असे फिर्यादीत नमुद आहे. ( girl was molested on pretext of giving lift shocking incident in lonavala city maval )
लोणावळा शहर पोलिस ठाण्यात मुलीच्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला गेला. त्यानंतर पोलिस कर्मचारी हनुमंत शिंदे, मनोज मोरे, राजेंद्र मदने यांच्या पथकाने मुलीच्या फिर्यादीनुसार शोध घेऊन आरोपीला अटक केली. सदर प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुजावर करत आहेत.
अधिक वाचा –
– किशोर आवारे हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! लेकानंतर वडीलांचाही कटात समावेश असल्याची माहिती । Kishor Aware Murder case
– दुचाकी चालवणाऱ्या प्रत्येकाने ही बातमी नक्की वाचा, 24 मे हा दिवस असणार अत्यंत महत्वाचा