आंदर मावळमधील मुख्य रस्ता असणाऱ्या टाकवे ते वडेश्वर या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज (सोमवार, दिनांक 22 मे) मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्याच्या कामासाठी सुमारे 9 कोटी 75 लक्ष रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आंदर मावळची मुख्य बाजारपेठ असलेल्या टाकवे येथे ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, फुल व्यावसायिक यांना रोज प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक देखील या भागात येत असतात. परंतू अरुंद आणि खड्डेमय रस्ता असल्याने यावरुन प्रवास करणे अवघड होत होते. ( andar maval takve to vadeshwar road Work was started )
ग्रामस्थांच्या मागणीनुसार टाकवे ते वडेश्वर अशा सुमारे दहा किलोमीटर रस्त्याचे काम या निधीतून करण्यात होणार आहे. सद्यस्थितीतील अरुंद रस्त्याचे साईड पट्ट्यांसह रुंदीकरण करण्यात येणार असल्याने या भागातील विकासाला नक्कीच गती मिळेल, हा विश्वास आहे. या कामाच्या शुभारंभ प्रसंगी तालुक्यातील जेष्ठ मान्यवर, आजी-माजी पदाधिकारी, सरपंच, सदस्य व नागरिक उपस्थित होते.
अधिक वाचा –
– सभापतीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? 24 मे रोजी बाजार समिती सभापती पदाची निवडणूक, ‘या’ नावांची सर्वाधिक चर्चा
– किशोर आवारे हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! लेकानंतर वडीलांचाही कटात समावेश असल्याची माहिती । Kishor Aware Murder case