महाराजस्व अभियानातंर्गत मावळ तालुक्यात ‘शासन आपल्या दारी’ ( Shasan Aplya Dari ) हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची गतिमानपद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी सर्व मंडळ स्तरावर ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. शासकीय योजनांशी निगडीत संबंधित कार्यालयाचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एकाच छताखाली एकत्र येऊन नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. ( Government At Your Doorstep Program In Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यात कुठे आणि कधी असणार कॅम्प?
दिनांक 23 मे – मंडल अधिकारी कार्यालय, वडगाव
दिनांक 23 मे – मंडल अधिकारी कार्यालय, कार्ला
दिनांक 24 मे – तलाठी कार्यालय सोमाटणे
दिनांक 24 मे – नगरपालिका शाळा क्रमांक 1 लोणावळा
दिनांक 25 मे – गणेश मंगल कार्यालय कामशेत
दिनांक 25 मे – शिवप्रसाद मंगल कार्यालय कोथुर्णे रोड
दिनांक 26 मे – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवणे
अभियाना अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजना खालीलप्रमाणे;
नवीन आधारकार्ड काढणे / दुरुस्ती करणे
नविन शिधापत्रिका अर्ज स्विकृती
शिधापत्रिकेवरील नाव कमी करणे, नाव वाढविणे
जीर्ण/ खराब शिधापत्रिका बदलणे
संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना
वृद्धापकाळ / विधवा /दिव्यांग राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना
नवीन वीज कनेक्शन अर्ज स्विकृती (घरगुती) > वीजबिल दुरुस्ती
नवीन मतदार नोंदणी करणे
उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला
जात प्रमाणपत्र (अर्ज स्विकृती)
जन्म, मृत्यु नोंदणी प्रमाणपत्र (अर्ज स्वीकृती)
विवाह नोंदणी प्रमाणपत्र (अर्ज स्वीकृत)
दिव्यांग प्रमाणपत्र (ऑनलाईन अर्ज भरणे)
दिव्यांगासाठी UDID कार्ड नोंदणी करणे
लोणावळा नगरपरिषदेच्या विविध योजना
कोविड- 19 प्रतिबंधात्मक लसीकरण
अधिक वाचा –
– वडगाव शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची तातडीने दुरुस्ती करण्याचे उपनगराध्यक्षांचे आदेश
– अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन, जाणून घ्या सविस्तर