मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संभाजी आनंदराव शिंदे यांची तर उपसभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नामदेव नाना शेलार यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया मागील एक महिन्यापासून सुरु होती. यातील प्रमुख टप्पा म्हणजेच निर्वाचित संचालकांमधून सभापती आणि उपसभापती पदाची निवड, ही प्रक्रिया देखील आज (बुधवार, दिनांक 24 मे) रोजी वडगाव मावळ येथे पार पडली. अगोदर झालेल्या संचालक पदांच्या निवडणूकीत महाविकासआघाडी पॅनलच्या 18 पैकी 17 जागा निवडणूक आल्या होत्या तर भाजपप्रणित मित्रपक्ष पॅनलची 1 जागा निवडणूक आली होती. त्यामुळे सभापती पदाच्या निवडणूकीत भाजपा अलिप्त राहिल असा अंदाज होता आणि त्यानुसार भाजपाने कोणतेही पाऊल या निवडणूकीत टाकले नाही. त्यामुळे ही निवडप्रकिया बिनविरोध होऊ शकली. ( maval taluka bajar samiti election ncp sambhaji shinde elected as chairman and namdev shelar elected as vice chairman unopposed )
तसेच महाविकासआघाडीच्या निर्वाचित संचालकांमध्ये म्हणजेच 17 संचालकांमध्ये प्रथम सभापतीपदासाठी मोठी रस्सीखेच होती. याबाबत दैनिक मावळने काही दिवसांपूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच यात आघाडीवर असणाऱ्या चार नावांत संभाजी शिंदे, सुभाष जाधव, नामदेव शेलार, शिवाजी असवले यांची नावे होते. यात प्राप्त माहितीनुसार संभाजी शिंदे आणि सुभाष जाधव यांच्या नावांत सभापती पदासाठी सर्वाधिक रस्सीखेच झाल्याचे पाहायला मिळाले. परंतू, आमदार सुनिल शेळके, बापू भेगडे, बबनराव भेगडे, माऊली दाभाडे आणि गणेश खांडगे यांच्या नेतृत्वात कुणा एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन निवड बिनविरोध होणार, असा अंदाज दैनिक मावळने वर्तवला होता. त्यानुसार अखेरीस संभाजी शिंदे यांच्या नावावर एकमत होऊन त्यांची प्रथम सभापती पदी वर्णी लागली, तर नामदेव शेलार यांना प्रथम उपसभापती पदाची संधी मिळाली आहे. यासह ही निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
अधिक वाचा –
– लोकसभेसाठी मविआचे उमेदवार ठरले? सोशल मीडियावर यादी व्हायरल, मावळमधून पार्थ पवारांचे नाव, चर्चांना उधाण
– मावळ तालुक्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम, पाहा तुमच्या भागात कधी आणि कुठे असेल कॅम्प