मावळ तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पाहायला मिळाली आहे. आंदर मावळ भागातील माळेगाव बुद्रुक मधील तळपेवाडी इथे बिबट्याच्या हल्ल्यात एका गरीब शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू झाला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तळपेवाडी (माळेगाव) येथील शेतकरी गिरजू गंगाराम लोहकरे यांच्या गोठ्यात बांधलेल्या बैलावर शुक्रवारी (दिनांक 26 मे) बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बैलाचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच शिरोता वनपरिक्षेत्र कर्मचारी एस. एस. बुचडे व श्रीमती के. एस. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्याच्या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे तपासले. तसेच, मृत बैलाचा पंचनामा करून शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला. ( bull died in leopard attack in maval taluka )
शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सुशिल मंतावार यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणात निर्माण झाले आहे. वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात येणार आहे. तरीही शेतकरी व नागरिकांनी आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. एकट्याने फिरण्याचे टाळावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– ‘आमदार सुनिल शेळकेंवरील संकट दूर व्हावे’, टाकवे बुद्रुक इथे समर्थकांकडून हनुमान मंदिरात महाअभिषेक
– लोणावळा पोलिसांची धडक कारवाई! गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून लाखो रुपयांचे कच्चे रसायन केले नष्ट