श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा इशा हॉटेल तळेगाव दाभाडे येथे पार पडली. सभेमध्ये गेली 45 वर्षे सहकार क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते बबनराव भेगडे यांना मानपत्र, फुले पगडी आणि उपरणे देऊन ‘सहकार भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, देशाच्या 75व्या अमृत महोत्सव निमित्त सीआरपीएफचे डीआईजी आयआयएम धीरज कुमार यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. ( Sahkar Bhushan Award to Babanrao Bhegde )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सभेच्या अध्यक्ष स्थानी पुणे पीपल्स कॉ ऑप बँकेचे अध्यक्ष सुभाष मोहिते आणि प्रमुख व्यक्ते जेष्ठ लेखक पानिपतकार विश्वास पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मावळचे आमदार सुनिल शेळके , माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे, सहकारमहर्षी माउली दाभाडे, बाप्पू भेगडे¸ गणेश काकडे, गणेश खांडगे, अशोक बाफना, विठ्ठलराव शिंदे, रवींद्र दाभाडे आदी तसेच मावळ तालुक्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
‘आपण किती चांगले काम करतो यावर संस्थेचे भवितव्य अवलंबून असते. गेली 31 वर्ष संस्था काम करीत आहे आणि ती चांगले करत आहे, म्हणून आजचा दिवस आहे. सहकार क्षेत्रात राज्य आणि देश पातळीवर मोठ्या प्रमाणात बदल होत असून देशाच्या इतिहासात प्रथमच सहकार मंत्रालय स्थापन झाले या मंत्रालयाच्या माध्यमातून सहकार क्षेत्राला नवीन दिशा देण्याचे धोरण अवलंबले आहे. 63 लाखापेक्षा जास्त सोसायट्या या ऑनलाइन झाल्या असून बाकी सोसायट्याना लवकरात लवकर ऑनलाईन करण्याचे धोरण सरकारने आखले आहे, असे प्रतिपदन माजी राज्यमंत्री बाळाभेगडे यांनी केले. ( Sahkar Bhushan Award to Babanrao Bhegde for his outstanding contribution in the field of cooperation )
अधिक वाचा –
लोणावळापासून काही अंतरावर डेक्कन क्वीन एक्सप्रेसला किरकोळ आग, प्रवाशांची उडाली भंबेरी
तळेगाव दाभाडे येथे स्वच्छता अभियान, माजी मंत्री बाळा भेगडे यांचा सहभाग I Talegaon Dabhade