व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील कुसवली येथील ‘सहारा’ वृद्धाश्रमाला अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा पहिला पुरस्कार

पिंपरी येथील मोरवाडी चौकातील अहिल्यादेवी पुतळ्याजवळ हा पुरस्कार सोहळा पार पडला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 1, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Sahara-old-age-home-maval

Photo Courtesy : Vijay Surana


वडगाव मावळ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती, पिंपरी चिंचवड शहर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पहिला कार्यगुण गौरव पुरस्कार मावळ तालुक्यातील सहारा वृद्धाश्रम या संस्थेस काल (बुधवार, दिनांक 31 मे) रोजी प्रदान करण्यात आला. अकरा हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पिंपरी येथील मोरवाडी चौकातील अहिल्यादेवी पुतळ्याजवळ हा पुरस्कार सोहळा पार पडला. रस्त्यावर सापडलेल्या अनाथ-निराधार आजी आजोबांचा विनामूल्य सांभाळ करणाऱ्या कुसवली (मावळ) येथील सहारा वृध्दाश्रम या संस्थेच्या प्रा. तृप्ती विजय जगताप व कमल काशिनाथ जगताप यांनी हा पुरस्कार स्विकारला. ( award to Sahara old age home at kusvali in Maval taluka )

पद्मश्री गिरीश प्रभुणे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, आमदार उमा खापरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, महापालिका अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहायक आयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जयंती महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक राजाभाऊ दुर्गे आदी यावेळी उपस्थित होते.

“जनतेसाठी आपले आयुष्य वेचणा-या अहिल्यादेवींच्या नावाने पुरस्कार सुरू झाला हि अत्यंत प्रेरणादायी बाब” असल्याचे पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी यावेळी म्हटले. तर “सामाजिक कार्याला पाठबळ देणाऱ्या अहिल्यादेवींच्या नावाच्या या पुरस्कार परंपरेला महापालिकेच्या वतीने सदैव पाठबळ देण्यात येईल” असे आयुक्त शेखर सिंह यांनी आपल्या भाषणात म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ दुर्गे यांनी केले, तर विजय बोत्रे-पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आभार मानले.

अधिक वाचा –
– मळवंडी ठुले गावात खरीप हंगाम सभा; कृषि विभागाकडून भातपीक आणि योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
– एक वर्षापूर्वी झालेल्या ‘त्या’ चोरीच्या गुन्ह्याचा वडगाव मावळ पोलिसांकडून छडा, मुद्देमालासह आरोपी गजाआड


dainik maval jahirat

Previous Post

कामशेत ते मळवली दरम्यान धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी महिलेचा मृत्यू

Next Post

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीला जाणाऱ्या वारकरी भाविकांना परतीच्या प्रवासासह टोलमाफी, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
eknath-shinde

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीला जाणाऱ्या वारकरी भाविकांना परतीच्या प्रवासासह टोलमाफी, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
Accidental gunshot while cleaning rifle Tragic death of former councilor son in Lonavala

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.