पुणे ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने “संकल्प नशामुक्ती” मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 4 जून रोजी सकाळी 6 वाजता लोणावळा शहरातील दाऊदी बोहरा मैदानावर मॅरेथॉनला सुरवात होणार आहे. प्रसिद्ध सिनेअभिनेता सुनिल शेट्टी याच्या हस्ते प्लॅग ऑफ करुन या मॅरेथॉनची सुरुवात होणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून पुणे ग्रामीण पोलिसांची वेबसाईट https://puneruralpolice.gov.in/ इथे नोंदणीची लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. शुक्रवार म्हणजेच 2 जून रात्रीपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे. मॅरेथॉनमध्ये लहान मुलांसाठी एक गट, 18 ते 25 वर्षांचा दुसरा गट आणि 25 वर्षांवरील खुला गट अशा तीन गटात ही मॅरेथॉन होणार आहे. ( actor sunil shetty to attend sankalp nashamukti marathon on June 4th in lonavla )
???? संकल्प नशामुक्ती
भागो और नशा भगाओमी सहभागी होतोय तुम्हीही मॅरेथॉनला या..सोबत मित्र मैत्रिणींना आवर्जून भाग घ्यायला सांगा.
चला संकल्प करूया..व्यसनमुक्तीला हद्दपार करूयात.
मॅरेथॉन मध्ये भाग घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा ????https://t.co/xVCbTvcShi#choosetorefuse pic.twitter.com/e86sNfncGE— पुणे ग्रामीण पोलीस – Pune Rural Police (@puneruralpolice) June 1, 2023
लोणावळा जगातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक आहे. परंतू अलिकडे या ठिकाणी होणारे मद्यपान, अंमली पदार्थांचे सेवन यामुळे पर्यटनस्थळ बदनाम होत आहे. त्याला आवर घालण्यासाठी संकल्प नशामुक्ती ही मोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती लोणावळा विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी दिली.
मॅरेथॉन स्पर्धेत नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीला जाणाऱ्या वारकरी भाविकांना परतीच्या प्रवासासह टोलमाफी, मुख्यमंत्र्यांचा निर्णय
– मावळमधील कुसवली येथील ‘सहारा’ वृद्धाश्रमाला अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा पहिला पुरस्कार