राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दिनांक 1 जून ) झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यावेळी गोसीखुर्द येथे जलपर्यटन, नागपूर येथील सोनेगाव तलावाचे सुशोभीकरण, कार्ला लोणावळा येथे चाणक्य सेंटर फॉर एक्सलन्स, मिठबाव येथील गजबादेवी मंदिर सुविधा प्रकल्प यांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राज्यात पर्यटनवाढीसाठी मोठा वाव आहे, पर्यटनाच्या अमर्याद संधी राज्यात उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागातील पर्यटनस्थळांचा दर्जा वाढवितानाच पर्यटकांच्या सोयीसाठी त्याठिकाणी चांगले रस्ते, दळणवळणाची साधने, निवासाची दर्जेदार व्यवस्था करा, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. ( maharashtra govt approves tourism projects to enhance state potential )
गोसीखुर्द जलाशय येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. गोसीखुर्द जलाशयात ४५ कि.मी. जलप्रवास पात्र आहे. याठिकाणची नैसर्गिक विविधता, मोठ्या बेटांची आणि बंदरांची उपलब्धता असल्याने आंतरराष्ट्रीय जलपर्यटन करण्यात येणार आहे. देशातील सर्वोत्तम असा हा जलपर्यटन प्रकल्प वेळेपूर्वी जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत राज्यातील पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांना मान्यता देण्यात आली.प्रत्येक विभागातील पर्यटनस्थळांचा दर्जा वाढवितानाच त्याठिकाणी चांगले रस्ते,दळणवळणाची साधने, निवासाची दर्जेदार व्यवस्था करा-मुख्यमंत्री pic.twitter.com/0SxQ3yZhsY
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 1, 2023
या बैठकीला पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक बैठकीस उपस्थित होते. तर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
अधिक वाचा –
– शाब्बास!! पवना विद्या मंदिर शाळेचा दहावीचा निकाल ९८.३४ टक्के, तब्बल ९३ टक्के गुणांसह रितेश ठुले प्रथम
– अभिनंदन..! दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 93.83 टक्के, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी, असा चेक करा निकाल