Dainik Maval News : घरासमोर चिठ्ठी टाकल्याच्या कारणावरून एका दाम्पत्याने लोखंडी पाइपने दुसर्या दाम्पत्याला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 11) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील वराळे येथे घडली.
अक्षय भानुदास आव्हाड (वय 27, रा. वराळे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रशांत सूर्यकांत सूर्यवंशी व त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या घरासमोर आरोपींनी दरवाजा वाजवून बाहेर बोलविले. फिर्यादी यांच्या आरोपींच्या घरासमोर चिठ्ठी टाकली असून त्यामध्ये वाईट मजकूर लिहिला असल्याचा आरोप करत केला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना लोखंडी पाइपने पाय, पाठ व खांद्यावर मारहाण केली.
फिर्यादी यांची पत्नी भांडण सोडविण्यास आली असता तिलाही आरोपी महिला यांनी मारहाण केली. आरोपींनी शिवीगाळ करून दमदाटी केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा ; छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पुढील पिढ्यांसाठी स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री
– कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का ! किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती । Virat Kohli Retires
– लोणावळ्यापर्यंत मेट्रो धावणार? ‘निगडी ते लोणावळा’ मेट्रो डीपीआर तयार करण्याची मनसेची मागणी । Pune Metro