लोकसभेच्या निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीत असलेला अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष मावळ लोकसभेची जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पिंपरी-चिंचवड युवक शहराध्यक्ष रविराज काळे हे मावळ लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे समजत आहे. आम आदमी पक्षाच्या येथे पुणे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मावळ लोकसभेची जागा आपण लढवणार आहोत. सध्या ही जागा शिवसेना पक्षाकडे होती, परंतू शिवसेना हा पक्ष सत्तेत असल्याने आम आदमी पक्ष ही जागा लढवणार आहे. महाराष्ट्रातील इतर जागांवर इंडिया आघाडीतील पक्षांचे उमेदवारांचे काम करणार आहोत, असेही सांगितले. ( Aam Aadmi Party will contest Maval Lok Sabha Pimpri Chinchwad Youth City President Raviraj Kale interested )
मावळच्या जागेबाबत सगळ्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. महाराष्ट्रातील पक्षाची ताकद इतर जागांच्या तुलनेत चांगली आहे. आपल्या कार्यकर्त्यांची ताकद पाहून आपण या जागेची निवड केली आहे. त्यासंदर्भात इंडिया आघाडीतील इतर पक्षाध्यक्ष यांच्याशी चर्चा करुन निर्णय होईल, असे रविराज काळे यांनी सांगितले.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याचा अंदाज आहे. लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे सरकार आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी आपल्याला प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल. असे कार्यकर्त्यांशी चर्चा करताना सांगितले.
अधिक वाचा –
– इंदोरीतील चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी । Savitribai Phule Jayanti
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची सिनेस्टाईल कारवाई! ड्र’ग्ज विक्री करणाऱ्या आरोपींना रंगेहात अटक । Kamshet Crime
– वडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निलेश म्हाळसकर बिनविरोध । Vadgaon Maval