व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, November 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची सिनेस्टाईल कारवाई! ड्र’ग्ज विक्री करणाऱ्या आरोपींना रंगेहात अटक । Kamshet Crime

आरोपी दुचाकीवरून फरार होत होता पण IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने जीवाची बाजी लावून त्याला पकडले!

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 3, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
IPS-Satya-Sai-Karthik-lonavala-kamshet-police

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ परिसरातील ड्रग्सचा वाढता विळखा रोखण्यासाठी आणि तरुणाईला नशेच्या आहारी जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी तसेच परिसर ड्रग्समुक्त करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस दलातर्फे लोणावळा उपविभागात सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पुढाकारातून संकल्प नशा मुक्ती अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अंम’ली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाया हाती घेतल्या आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

दरम्यान आयपीएस सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे ताजे आणि नायगाव परिसरात काहीजण हे मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अं’मली पदार्थाची छुप्या पद्धतीने विक्री करत आहेत. त्यामुळे परिसरातील तरुणाई ड्र’ग्सच्या विळख्यात अडकत चालली आहे. बातमीचे गांभीर्य ओळखून सत्यसाई कार्तिक यांनी अत्यंत कमी वेळेमध्ये सदर आरोपींच्या येण्या-जाण्याचे मार्ग, त्यांची कार्यपद्धती इ.ची इत्यंभूत माहिती मिळवून पथकासह दिनांक 30 डिसेंबर 2023 चे रात्रीपासून मौजे ताजे परिसरात सापळा रचला होता. ( drug peddlers arrested in kamshet police station limit by IPS Satya Sai Karthik Team Pune Police )

  • दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी पहाटे 2.25 वाजताच्या सुमारास आरोपी खंडू कुटे हा त्याच्या बाईकवरून ताजे गावाकडून पिंपलोळी गावाकडे येत आहे, अशी खात्री होताच पथकाने त्याला चहू बाजूंनी घेरले. परंतू पोलिसांची चाहूल लागताच आरोपी खंडू कुटे हा कारवाईच्या भीतीने बाईक भरधाव वेगात पळवत तेथून पसार होण्याचा प्रयत्न करू लागला. परंतू पोलीस पथकाने जीवाची पर्वा न करता आरोपी खंडू कुटे यास सिनेस्टाईलने ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 30 ग्रॅम वजनाचा 90,000 किमतीचा विक्रीसाठी आणलेला अं’मली पदार्थ आणि त्याची पॅकिंग व विक्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॅकींगच्या पिशव्या असा एकूण सुमारे 1 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच, त्यानंतर दिनांक 31 डिसेंबर रोजी रात्री 8.55 वाजता सत्यसाई कार्तिक यांनी पथकासह नायगाव परिसरात सापळा रचला असता आरोपी 1) रोशन चंद्रकांत ओव्हाळ (वय 24 वर्ष, रा.नायगाव ता. मावळ) 2) अमित भरत भानुसघरे (वय 24 वर्ष, रा देवराम कॉलनी कामशेत) हे दोघे दुचाकीवरून अं’मली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेले असताना पथकाने त्या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्यांच्या अंगझडतीत दोघांकडे प्रत्येकी 5 ग्रॅम असा एकूण 30,000 रूपये किमतीचा अं’मली पदार्थ मिळून आला आहे.

वर नमूद दोन्ही कारवायांमध्ये 1 लाख 20 हजार रूपये किंमतीचा 40 ग्रॅम वजनाचे ड्र’ग्ज आणि एकूण 2 लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल रहिस मुलानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 चे विविध कलमान्वये कामशेत पोलीस स्टेशन इथे दोन स्वतंत्र गुन्हे नोंद कण्यात आली असून पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोसई भारत भोसले, पोहवा सचिन गायकवाड, पोहवा नितेश (बंटी) कवडे, पोहवा अंकुश नायकुडे, पोकॉ रहीस मुलानी, पोकॉ सुभाष शिंदे, पोकॉ अमोल ननवरे, पोकॉ अंकुश पवार, पो कॉ आशिष झगडे, होमगार्ड सागर दळवी यांच्या पथकाने केली आहे.

अधिक वाचा –
– बापरे बाप! लोणावळा उपविभागात तब्बल 510 वाहन चालकांवर कारवाई, 3 लाख 61 हजारांचा दंड वसूल । Lonavala News
– मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्व्हेक्षणाचे काम बिनचूक व्हावे – मुख्यमंत्री । Maratha Reservation
– किल्ले तुंग दुर्गसंवर्धन प्रकल्पासाठी राज्य पुरातत्व विभागाकडून 1 कोटी 56 लाख निधी मंजूर । Tung Fort


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निलेश म्हाळसकर बिनविरोध । Vadgaon Maval

Next Post

इंदोरीतील चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी । Savitribai Phule Jayanti

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Savitribai-Phule-Jayanti

इंदोरीतील चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी । Savitribai Phule Jayanti

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Theft-News

Lonavala Crime : लोणावळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री पाच दुकाने फोडली, १६ हजारांची रोकड लंपास

November 17, 2026
Pappu Kalekar from Maval selected for global wrestling referee examination to be held in Egypt

मावळातील पप्पू कालेकर यांची इजिप्त येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती पंच परिक्षेसाठी निवड; तर प्रविण राजिवडे राष्ट्रीय पंच परिक्षा अव्वल श्रेणीत उत्तीर्ण

November 17, 2026
water scarcity in Dhalewadi-Malewadi village stage lock the office protest at Mahagaon Gram Panchayat Maval

धालेवाडी-मालेवाडीत तीव्र पाणीटंचाई, पाण्यासाठी दोन तासांची पायपीट; महागाव ग्रामपंचायतीला ग्रामस्थांचे ‘टाळे ठोको’ आंदोलन

November 17, 2026
Union Home and Cooperation Minister Amit Shah two-day visit to Pune National Heavy Engineering Company Talegaon Dabhade Maval

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचा दोन दिवसीय पुणे दौरा; मावळातील नॅशनल हेव्ही इंजिनिअरिंग कंपनीच्या पुनर्निर्माणाचे आज भूमिपूजन

November 15, 2026
Locals oppose supplying water from Thokalwadi Dam Maval to Pimpri-Chinchwad

‘ठोकळवाडी’चे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास स्थानिकांचा विरोध ; धरणग्रस्तांचा ऐतिहासिक संघर्ष, शेतीच्या पाणीहक्कासाठी सर्वपक्षीय एकजुटीचा निर्धार

November 14, 2026
discussions on development issues in Takve-Vadeshwar ZP Gat initiative by Zilla Parishad Pune

जनतेच्या दारात प्रशासन; टाकवे-वडेश्वर गटात विकासाच्या प्रश्नांवर थेट चर्चा, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा अभिनव उपक्रम

November 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.