अभंग प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष वसंत परशुराम भसे यांच्या वाढदिवसानिमित्त सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस पाहता उष्णता वाढत आहे हे लक्षात घेऊन सांगुर्डी गावातील जिल्हा परिषद शाळा आणि विठ्ठल नगर येथील जिल्हा परिषद शाळा येथे फॅन भेट देण्यात आले. याशिवाय या ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले गेले. ( Abhanga Pratishthan Dehu Vasant Bhase gifted fans to schools on his birthday )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्रत्येक गावातील शाळा या समाज विकासाचे केंद्र असतात. विशेषतः आज जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रत्येक गावातील तरुणांनी लक्ष देऊन या शाळांच्या भौतिक सुविधा व सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. आज जिल्हा परिषद शाळेत शिकणारी मुले ही विशेषतः कष्टकरी,कामगार वर्ग या परिवारातील असून प्रतिकूल स्थितीचा संघर्ष करून शिकणारी आहेत.
अशा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व या मुलांच्या गुणांना वाव देण्यासाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन अभंग प्रतिष्ठान च्या माध्यमातून सातत्याने जिल्हा परिषद शाळांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. येथील शिक्षकांशी संवाद साधून येथील प्रश्न समजून घेतले जातात. या शाळांना मदत मिळविण्यासाठी आपल्या अवतीभवतीच्या कंपन्यांमधील सीएसआर फंडासाठी प्रयत्न केले जातात. आज शाळेमध्ये सातत्याने होत असलेल्या अशा उपक्रमातून एक विधायक बदल घडताना दिसत आहे.
अभंग प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष वसंत परशुराम भसे यांनी देखील हाच मानस ठेवून आपल्या गावातील शाळेमध्ये एका सेवाभावी उपक्रमातून आपला वाढदिवस संपन्न केला. याप्रसंगी अभंग प्रतिष्ठानचे सचिव सचिन लिंभोरे, संतोष भसे, राजेंद्र भसे, नारायण मराठे, सचिन कुंभार, सचिन काळोखे, निलेश मिरजकर, विकास कंद उपस्थित होते केला. अभंग प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले.
अधिक वाचा –
– बाळा भेगडे यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी! चिंचवडची जागा राखल्यानंतर ‘या’ ठिकाणी करिष्मा दाखवण्याची संधी
– आश्विनी जगताप यांच्या विजयानंतर कामशेत इथे भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाके फोडत वाटली मिठाई