व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेत येथे इनोव्हा कारचा भीषण अपघात ! सामुदायिक विवाह सोहळ्याला निघालेल्या दोघींवर काळाचा घाला । Kamshet Accident

कामशेत जवळ जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर नायगाव (ता. मावळ) येथे एका भरधाव इनोव्हा कारचा भीषण अपघात (दि. 26 एप्रिल) झाला. या अपघातात दोघींचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 27, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Accident at Naigaon Near Kamshet

Photo Courtesy : Team Dainik Maval


कामशेत जवळ जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर नायगाव (ता. मावळ) येथे एका भरधाव इनोव्हा कारचा भीषण अपघात (दि. 26 एप्रिल) झाला. या अपघातात दोघींचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी (दि. 26) सकाळी साडेनऊ च्या सुमारास हा अपघात घडला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सीताबाई तुकाराम लालगुडे (वय 58, रा. कुसगाव खुर्द, ता. मावळ) आणि सिद्धी संतोष तिकोने (वय 18, रा. पाटण, ता. मावळ) अशी मृत्यू
झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर रिद्धी संतोष तिकोने (वय 14, रा. पाटण, ता. मावळ) आणि प्रियंका संग्राम भानुसघरे, सुभद्रा किसन भानुसगरे, लता किसन पिंजन असे चारजण जखमी झाले आहेत. ( Accident at Naigaon Near Kamshet Two Women Killed While Going To Attend Community Wedding Karla )

या प्रकरणी ऋषीनाथ तुकाराम लालगुडे (वय 43, रा. कुसगाव खुर्द, ता. मावळ) यांनी कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, इनोव्हा वाहन चालक सुमित गुलाब पिंजन (वय 23, रा. कीनई, ता. मावळ) या चालकावर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी सुमित गुलाब पिंजन याने त्याच्या ताब्यातील इनोव्हा कार नायगाव गावच्या हद्दीतून जुन्या मुंबई-पुणे हायवेवरून पुणेहून मुंबईच्या दिशेने जात असताना भरधाव वेगात, अविचाराने, रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करून चालवली. त्यामुळे इनोव्हा कार पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू आणि अन्य जण जखमी झाले, म्हणून त्याच्या विरोधात दाखल फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याच आला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोसई शुभम चव्हाण करत आहेत.

अधिक वाचा –
– श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी लोणावळ्यात महायुतीचा पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा । Lonavala News
– महिंद्रा कंपनीकडून तळेगावमधील ॲड. पु. वा. परांजपे शाळेला ‘सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन’ची मदत । Talegaon Dabhade
– ‘धर्मराज्य’ पक्षाकडून महेश ठाकूर यांनी भरला मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज, कोण आहेत महेश ठाकूर? जाणून घ्या । Maval Lok Sabha


Previous Post

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून मे महिन्यातील दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे

Next Post

राजकारणातील नवा ‘संजय’ छाननीत नापास ! मावळ लोकसभेसाठी दाखल 50 अर्जांपैकी 3 अर्ज बाद, वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval Lok Sabha Constituency

राजकारणातील नवा 'संजय' छाननीत नापास ! मावळ लोकसभेसाठी दाखल 50 अर्जांपैकी 3 अर्ज बाद, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Gudi Padwa day became historic stolen spire of temple of Goddess Ekvira Devi was recovered after 8 years

यंदाचा गुढीपाडवा ठरला ऐतिहासिक ! आई एकविरा देवीच्या मंदिराचा चोरीला गेलेला कळस तब्बल ८ वर्षांनी मिळाला परत

March 21, 2026
Pimpri-Chinchwad Municipal Corporation

‘पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पवना प्रकल्पातून 520 एमएलडी आणि आंद्रा प्रकल्पातून 100 एमएलडी पाण्याचे नियोजन’

March 21, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा शासनाचा निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 21, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

महसूल विभागात मोठा गैरप्रकार ! हजारो शेतकऱ्यांचे सातबारे बदलले ? महसूल कायद्याच्या कलम १५५ चा गैरवापर झाल्याची सरकारची कबुली

March 21, 2026
Mega plan to break traffic jam at Chakan Chowk Plans to create 4 new missing links like Mumbai-Pune missing link

चाकण चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन ! मुंबई-पुणे मिसिंग लिंक सारखे 4 नवीन मिसिंग लिंक तयार करण्याचे नियोजन

March 21, 2026
Second-Registrar-Office-Vadgaon-Maval

मोठी बातमी ! सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

March 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.