व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महिंद्रा कंपनीकडून तळेगावमधील ॲड. पु. वा. परांजपे शाळेला ‘सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन’ची मदत । Talegaon Dabhade

कंपनीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. उपस्थित सर्व मान्यवरांना प्रशालेच्या वतीने शाल बुके व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 26, 2024
in लोकल, शहर
Sanitary Napkin Vending and Disposal Machine

Photo Courtesy : Team Dainik Maval


चाकण येथील महिंद्रा ऑटो स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सीएसआर फंडमधून तळेगाव दाभाडे येथील ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर शाळेत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन ( sanitary napkin vending and disposal machine ) देण्यात आले. ह्या मशीनते उद्घाटन आणि हस्तांतरण बुधवारी (दि. 24 एप्रिल) कऱण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

ॲड. पु.वा. परांजपे विद्या मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार यांच्या दुरदर्शी मार्गदर्शनाखाली शाळेची प्रगती होत आहे. त्यांच्या उपक्रमशीलतेला प्रतिसाद म्हणून महिंद्रा ऑटो स्टील प्रायव्हेट लिमिटेड, चाकण कंपनी मार्फत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व डिस्पोजल मशीन देण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिंद्रा ऑटो स्टील प्रायव्हेट लिमिटेड चाकण कंपनीचे हेड कमर्शिअल प्रसाद पादीर होते. सीनियर एक्झिक्यूटिव्ह कमर्शिअल दिनेश भोसले, बाबाराजे ढाकणे व एक्झिक्यूटिव्ह कमर्शिअल मंगेश जाधव उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन प्रतिमापूजन करण्यात आले. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व डिस्पोजल मशीन उद्घाटन व हस्तांतरण संपन्न झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. पु.वा.परांजपे विद्यामंदिराच्या पर्यवेक्षिका कमल ढमढेरे यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी शाळेचा ऐतिहासिक वारसा त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळात शाळेने विद्यार्थ्यांसाठी राबवलेले विविध उपक्रम, शाळेतील भौतिक सुविधा, त्याचप्रमाणे शाळेचा उंचावत जाणारा यशाचा आलेख इ. विषयी माहिती देत महिंद्रा ऑटो स्टील प्रायव्हेट लिमिटेड चाकण कंपनीने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेऊन केलेल्या भरीव मदतीबद्दल ऋण व्यक्त केले.

महिंद्रा ऑटो स्टील प्रायव्हेट लिमिटेड चाकण कंपनीचे हेड कमर्शिअल प्रसाद पादीर यांनी आपल्या मनोगतातून कंपनीच्या सीएसआर फंडातून ग्रामीण भागातील विविध ग्रामपंचायत त्याचप्रमाणे विविध शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, वृक्षारोपण आदी कंपनी मार्फत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कंपनीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. उपस्थित सर्व मान्यवरांना प्रशालेच्या वतीने शाल बुके व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या अध्यापिका अनिता नागपुरे यांनी केले. आभार ज्येष्ठ अध्यापिका श्रीमती दुर्गा भेगडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. ( Mahindra Company Gave Sanitary Napkin Vending and Disposal Machine to Paranjape School Talegaon Dabhade )

Novel NIBR Ads

अधिक वाचा –
– महागांव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राणी साबळे यांची बिनविरोध निवड । Gram Panchayat Election
– संतापजनक ! अतिक्रमणाची बातमी लावली म्हणून पत्रकारांना शिवीगाळ आणि दमदाटी, कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल । Maval Crime
– काय सांगता ? अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मावळ लोकसभेसाठी ‘संजय वाघेरे’ नावाने उमेदवारी अर्ज दाखल । Maval Lok Sabha


dainik maval jahirat

Previous Post

‘धर्मराज्य’ पक्षाकडून महेश ठाकूर यांनी भरला मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज, कोण आहेत महेश ठाकूर? जाणून घ्या । Maval Lok Sabha

Next Post

श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी लोणावळ्यात महायुतीचा पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा । Lonavala News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Mahayuti Melava Lonavala

श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी लोणावळ्यात महायुतीचा पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.