पनवेल-कर्जत रेल्वेच्या दुसऱ्या मार्गाचे काम करताना शुक्रवारी (23 डिसेंबर) ठेकेदारांनी निष्काळजीपणे केलेल्या ब्लास्टिंगमुळे किरवली गावातील मायलेकाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. किरवली गावातील सचिन बडेकर आणि त्यांची आई देवका बडेकर यांच्या मृतदेहावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आज (शनिवार, 24 डिसेंबर) रोजी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी बडेकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. ( Accident During Work On Karjat Panvel Railway Line Mother And Son Death From Kirwale Raigad MP Shrirang Barane Met Family Members )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शनिवारी सकाळी खासदार श्रीरंग बारणे यांनी किरवली गावात जात सचिन बडेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द दिला. बडेकर कुटुंबियांची भेट घेऊन खासदारांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सचिन महादू बडेकर आणि देवका महादु बडेकर यांना ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे खासदार बारणे यांनी यावेळी संगितले आहे.
कर्जत चौक रस्त्यापासून साधारण वीस मीटर अंतरावर वावर्ले गावाजवळ हे ब्लास्टिंग करण्यात आले असून ब्लास्टिंग करताना कोणतीच काळजी न घेता आणि मार्गावरील वाहतूक विशिष्ट अंतरावर न थांबवता ब्लास्टिंग केल्याने निष्पाप मायलेकाला जीव गमवावा लागला. ब्लास्टिंगमुळे 7 बाईकस्वार गंभीर जखमी झाले आहेत. ब्लास्टिंगमध्ये उडालेले दगड रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांवर आल्याने दुकानदार देखील जखमी झाले असून दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचवेळी ट्रॅकच्या वरच्या बाजूला असलेला डंपरनेही पेट घेतला. डंपरच्या डिझेल टाकीचा आणि टायरचा स्फोट झाला. या सर्व घटनांची खासदार बारणे यांनी माहिती घेतली. प्रशासनाकडून मायतांच्या कुटुंबाला पुर्णपणे मदत केली जाईल, मी स्वतः प्रशासकीय अधिकारी, रेल्वे अधिकारी तसेच ठेकेदारशी बोललो आहे. प्रशासन बडेकर कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची माहिती बारणे यांनी दिली आहे.
घटनास्थळावर खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी, उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ( Accident During Work On Karjat Panvel Railway Line Mother And Son Death From Kirwale Raigad MP Shrirang Barane Met Family Members )
(माहिती स्त्रोत – जगदीश दगडे, रायगड)
अधिक वाचा –
– नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या पवना विद्या संकुलातील शाळांचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
– सावधान..! लोणावळ्यात येत असाल तर मास्क लावा आणि कोरोना नियमांचे पालन करा, अन्यथा…
– थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर सेलिब्रेशनदरम्यान पर्यटकांची सुरक्षितता महत्वाची; लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून हॉटेल व्यावसायिकांना सुचना