जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर बॅटरी हिल जवळ कंटेनर आणि कारच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दाेघांचा जागीच मृत्यू झालाय, तर सहा जण जखमी झाले आहेत. या अपघातामधील सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारवर पलटल्याने हा अपघात झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लोणावळ्याकडून जुन्या मुंबई पुणे महामार्गाने मुंबईकडे जात असताना वाघजाई मंदिराच्या पुढे बॅटरी हिल परिसरात या रस्त्याला तीव्र उतार आणि वळण आहे. याच ठिकाणी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर (एम.एच. 14 एफ.टी. 1445) हा समोरून येणाऱ्या कारवर (एम.एच. 14 बी.एक्स. 1605) पलटला. ( Accident near Lonavala at Battery Hill Khandala container overturned on car Two killed )
मिळालेल्या माहितीनुसार सदर कार ही अलिबागवरून तळेगाव (ता. मावळ) या दिशेने निघाली होती. कार मधून तळेगाव येथील रहिवासी असलेल्या चौधरी कुटुंबातील आठ जण प्रवास करीत होते. अपघातात दतात्रय रामदास चौधरी (वय 55 वर्ष) आणि कविता दतात्रय चौधरी (वय 46 वर्ष, दोघेही रा. निमडाळे, धुळे, सध्या रा. देवकणपिंपरी, जळगाव) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर भुमिका दतात्रय चौधरी (वय 16 वर्ष) व मितांश दतात्रय चौधरी (वय 9 वर्ष, दोघेही रा. निमडाळे, धुळे, सध्या रा. देवकणपिंपरी, जळगाव), योगेश श्रीराम चौधरी (वय 40 वर्ष), जान्हवी योगेश चौधरी (वय 31 वर्ष), दिपांशा योगेश चौधरी (वय 9 वर्ष) आणि जिगीशा योगेश चौधरी (वय 1.5 वर्षे, चौघेही राहणार संस्कृती बिल्डींग, राव कॉलनी, तळेगाव) हे सहा जण किरकोळ जखमी झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे सदस्य, महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले. सर्वप्रथम कार मध्ये अडकलेले सर्व जखमी तसेच दोन्ही मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर क्रेनच्या मदतीने सदर अपघातग्रस्त कार रस्त्यावरून बाजूला केली. अपघातानंतर कंटेनरचा चालक पळून गेला असून लोणावळा शहर पोलिसांनी भा.द.वि.क. 304 (अ), 279, 337, 338 मोटार व्हेकल अॅक्ट 184, 134 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास स.पो.नि. लाड हे करीत आहे.
अधिक वाचा –
– बारावीचा निकाल चेक करण्यासाठी लिंक, तुमच्याकडे इंटरनेट नसेल तरीही चेक करता येईल रिझल्ट, जाणून घ्या सोपी पद्धत । HSC Result 2024
– बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचाच डंका ! कोकण विभाग पुन्हा अव्वल, वाचा निकाल सविस्तर । HSC Exam2024
– महावितरणचा गलथान कारभार, मावळ तालुक्याचे मुख्यालय वडगाव शहरात तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव ! Vadgaon Maval