Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषC अपघात झाला, यात दोघांचा मृत्यू झाला असून वाहनाचे नुकसान झाले आहे. राकेश कुमार नेत प्रसाद यादव (वय 31, व्या. ड्रायव्हर रा. इंदिरा नगर, मुंबई मुळ रा. रतनपुर , जि बलरापुर उत्तरप्रदेश) यांनी याबाबत कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, सीमेंट मिक्सर वाहन (क्रमांक एमएच 46 बीयू 5697) वरील चालक राजेश यादव (वय 30, रा. बेहरा, आजमगढ, उत्तरप्रदेश) याच्या विरोधात कामशेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 106 (1), 281, 125 (A) (B), 324 (4), मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 184,134 (अ) (ब), 177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- शनिवारी (दि. 31 मे) पहाटे साडेतीनच्या सुमारास ताजे गाव (ता. मावळ) हद्दीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील किलोमीटर 67/700 या ठिकाणी मुंबई मार्गिकेवर हा अपघात घडला. अजय कन्हैयालाल यादव (वय 25, रा. मुंबई) आणि अफजल मुर्तुजा खान (वय 39, रा. बजुरामपुर, उत्तरप्रदेश) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शनिवारी पहाटे त्यांच्या पिकअप वाहनाने मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून मुंबईच्या दिशेने जात होते. तेव्हा त्यांच्या पिकअप टेम्पो वाहनाचे (क्रमांक एमएच 01 डीआर 7567) चाक ताजे गावच्या हद्दीत पंक्चर झाले. त्यामुळे त्यांनी वाहन किलोमीटर 67/700 येथे सुरक्षितरित्या बाजूला घेतले. त्यानंतर वाहनातील फिर्यादीचे सहाय्यक अजय आणि अफजल हे पंक्चर काढत होते. त्यावेळी सीमेंट मिक्सर वाहन (क्रमांक एमएच 46 बीयू 5697) वरील चालक राजेश यादव याने फिर्यादी करीत असलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने येत रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या पीकअप वाहनाला जोरदार धडक दिली.
अपघातात पीकअपचे पंक्चर काढत असलेला अजय यादव आणि अफजल मुर्तुजा हे दोघेही मिक्सरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच वाहनाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर सीमेंट मिक्सर वाहनावरील चालक अपघाताची माहिती न देता व वैद्यकीय मदत मिळवून न देता पळून गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि पोवार हे करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway
