व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ताजे गावाजवळ भीषण अपघात ! पिकअपचे पंक्चर काढत असलेल्या दोघांना भरधाव वाहनाने चिरडले, दोघांचा जागीच मृत्यू

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषC अपघात झाला, यात दोघांचा मृत्यू झाला असून वाहनाचे नुकसान झाले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 31, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Accident

File Image


Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषC अपघात झाला, यात दोघांचा मृत्यू झाला असून वाहनाचे नुकसान झाले आहे. राकेश कुमार नेत प्रसाद यादव (वय 31, व्या. ड्रायव्हर रा. इंदिरा नगर, मुंबई मुळ रा. रतनपुर , जि बलरापुर उत्तरप्रदेश) यांनी याबाबत कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, सीमेंट मिक्सर वाहन (क्रमांक एमएच 46 बीयू 5697) वरील चालक राजेश यादव (वय 30, रा. बेहरा, आजमगढ, उत्तरप्रदेश) याच्या विरोधात कामशेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 106 (1), 281, 125 (A) (B), 324 (4), मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 184,134 (अ) (ब), 177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • शनिवारी (दि. 31 मे) पहाटे साडेतीनच्या सुमारास ताजे गाव (ता. मावळ) हद्दीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील किलोमीटर 67/700 या ठिकाणी मुंबई मार्गिकेवर हा अपघात घडला. अजय कन्हैयालाल यादव (वय 25, रा. मुंबई) आणि अफजल मुर्तुजा खान (वय 39, रा. बजुरामपुर, उत्तरप्रदेश) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शनिवारी पहाटे त्यांच्या पिकअप वाहनाने मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून मुंबईच्या दिशेने जात होते. तेव्हा त्यांच्या पिकअप टेम्पो वाहनाचे (क्रमांक एमएच 01 डीआर 7567) चाक ताजे गावच्या हद्दीत पंक्चर झाले. त्यामुळे त्यांनी वाहन किलोमीटर 67/700 येथे सुरक्षितरित्या बाजूला घेतले. त्यानंतर वाहनातील फिर्यादीचे सहाय्यक अजय आणि अफजल हे पंक्चर काढत होते. त्यावेळी सीमेंट मिक्सर वाहन (क्रमांक एमएच 46 बीयू 5697) वरील चालक राजेश यादव याने फिर्यादी करीत असलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने येत रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या पीकअप वाहनाला जोरदार धडक दिली.

अपघातात पीकअपचे पंक्चर काढत असलेला अजय यादव आणि अफजल मुर्तुजा हे दोघेही मिक्सरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच वाहनाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर सीमेंट मिक्सर वाहनावरील चालक अपघाताची माहिती न देता व वैद्यकीय मदत मिळवून न देता पळून गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि पोवार हे करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway


Previous Post

नागरिकांना वेळ द्या, त्यांचे प्रश्न सोडवा ; लोणावळ्यातील आढावा बैठकीत आमदार शेळके यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी । Lonavala News

Next Post

मोठी बातमी : पुण्यात मद्यपी वाहन चालकाने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना उडवले, बारा जण जखमी, मुख्यमंत्र्यांकडून दखल । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Drunk driver runs over MPSC students in Pune twelve injured CM Fadanvis takes note

मोठी बातमी : पुण्यात मद्यपी वाहन चालकाने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना उडवले, बारा जण जखमी, मुख्यमंत्र्यांकडून दखल । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chief Minister reviews general district annual plans of Pune district

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा

February 15, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

Maval Crime : वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे

February 15, 2026
Lord-Shankar-Temple-In-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील ‘ही’ प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka

February 15, 2026
Raje Shiv Chhatrapati Jayanti Festival 2026 Committee at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव २०२६ समिती अध्यक्षपदी कुलदीप ढोरे, कार्याध्यक्षपदी संतोष भिलारे

February 14, 2026
On occasion of Mahashivratri Akhand Harinam saptah at Shri kshetra Ghoravadeshwar Maval

महाशिवरात्री निमित्त PMPML कडून मावळातील श्री क्षेत्र घोरवडेश्वर इथे जाण्यासाठी रविवारी विशेष बससेवा

February 14, 2026
Crime

चुलत भावाकडून तरूणाचा खून, आरोपी फरार ; मावळातील धक्कादायक घटना, पोलिसांकडून तपास सुरू

February 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.