अपघाताचा मार्ग जणू बनत चाललेल्या तळेगाव चाकण मार्गावर गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात आणखी एका निष्पाप नागरिकाचा जीव गेला आहे. ( Accident Near Vadgaon Fata on Talegaon Chakan Road One Person Died Case Registered In Talegaon Dabhade Police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गुरुवार (2 मार्च) रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास तळेगाव चाकण मार्गावर वडगाव फाट्यानजीक हा अपघात झाला. एका भरधाव कंटेनरने (क्रमांक एम.एच. 48 बी.एम. 3560) दुचाकीला (क्रमांक एम.एच. 14 ए.जे. 3207) जोरदार धडक दिली. त्यानंतर हा कंटेनर झाडाला धडकून पायी चालत असलेल्या एका व्यक्तीला चिरडून रस्त्यावर आडवा होत विरुद्ध दिशेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन धडकला. या भीषण अपघातात दुचाकीस्वार बचावलेत, मात्र एक पादचारी जागीच ठार झाला. मुळ तामिळनाडू येथील तो रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. तर जखमी दुचाकीस्वारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तळेगाव दाभाडे आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीवर ही घटना घडल्याने सदर अपघाताची माहिती मिळताच रात्री दोन्ही ठिकाणचे वााहतूक पोलिस, कर्मचारी दाखल झाले. त्यांनी कंटेनर बाजूला सारुन वाहतूक सुरळीत केली. तसेच तळेगाव दाभाडे पोलिसांत जखमींनी दिलेल्या फिर्यादीवरुन पुढील तपास पोलिस करत आहेत, तसेच फरार कंटेनर चालकाचा शोध सुरु आहे.
अधिक वाचा –
– देहूरोड पोलिसांची जबरदस्त कामगिरी, लाखोंची लुटमार करणाऱ्या आरोपीला सिनेस्टाईलने अटक, वाचा सविस्तर
– कोर्टात केस दाखल केली म्हणून हॉटेल व्यावसायिकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी, गहुंजेतील धक्कादायक प्रकार