शनिवारी ( दि. 09/12/2023 ) रोजी मध्यरात्री 23:00 वाजताच्या सुमारास मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर किलोमीटर 37.200 च्या दरम्यान छोटा दुध टँकर (क्रमांक MH-03-CV-9330) वरील चालक गणेश ढगे (वय 27, रा.म्हापे MIDC – नवी-मुंबई) हा पुणे कडून मुंबई बाजूकडे जात असताना समोर जाणाऱ्या अज्ञात वाहनावर आदळला. त्यामुळे टँकरचे समोरील भाग चेपल्याने त्याचे छातीत स्टेअरिंग अडकल्याने त्यास गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच मृत झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाट, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, खोपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी इत्यादी यंत्रणा अपघात स्थळी दाखल झाल्या. क्रेन आणि इतर साधनांनी अडकलेल्या चालकाला बाहेर काढून त्याचे शव खोपोली नगरपालिका रुग्णालयात नेण्यात आले. खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडल्याने त्या संबंधात अधिक तपास सुरू आहे. ( Accident of tanker transporting milk on Mumbai Pune Expressway )
अधिक वाचा –
– अवघा रंग एक झाला…! चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन
– तळेगाव रोटरी क्लबच्या वतीने 488 विद्यार्थ्यांचे धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण । Talegaon Dabhade
– मावळचे खासदार श्रीरंग बारणेंना लोकसभेच्या पीठासीन अधिकारी पदाचा बहुमान; लोकसभा अध्यक्षा ओम बिर्ला यांची घोषणा