व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळचे खासदार श्रीरंग बारणेंना लोकसभेच्या पीठासीन अधिकारी पदाचा बहुमान; लोकसभा अध्यक्षा ओम बिर्ला यांची घोषणा

देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या लोकसभेच्या सभागृहात पीठासीन अधिकाऱ्याचे कामकाज करण्याची संधी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना मिळणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 9, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, देश-विदेश, पुणे, महाराष्ट्र, शहर
MP-Srirang-Barne

Photo Courtesy : Facebook / MP Shrirang Barne


देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या लोकसभेच्या सभागृहात पीठासीन अधिकाऱ्याचे कामकाज करण्याची संधी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना मिळणार आहे. बारणे यांची तालिका अध्यक्षपदाच्या पॅनेलवर नियुक्ती करण्यात आली. लोकसभा अध्यक्षा ओम बिर्ला यांनी सभागृहात बारणे यांच्या नावाची घोषणा करताच सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तालिका अध्यक्षांचे पॅनेल जाहीर केले. सभागृहात अध्यक्ष उपस्थित नसल्यास उपाध्यक्ष कामकाज पाहतात. परंतु, लोकसभेत उपाध्यक्षाची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे अध्यक्षांच्या अनुउपस्थित तालिका अध्यक्षच कामकाज पाहतात. सभागृहातील कामकाजातील चमक, अनुभव आणि ज्येष्ठता या निकषांवर तालिका अध्यक्षांची निवड केली जाते. लोकसभा अध्यक्षांनी खासदार श्रीरंग बारणे यांची तालिका अध्यक्षांच्या पॅनेलवर निवड केली आहे. त्यामुळे बारणे यांना पीठासीन अधिकाऱ्याचे कामकाज करण्याची संधी मिळणार आहे. ( Maval MP Shrirang Barane became Lok Sabha Presiding Officer )

खासदार बारणे हे सलग दुस-यावेळी खासदार आहेत. 2014 पासून ते मावळचे प्रतिनिधीत्व करतात. सभागृहाच्या कामकाजात त्यांची शंभर टक्के उपस्थिती असते. विविध चर्चेमध्ये सहभाग, मतदारसंघातील प्रश्न विचारण्यामध्ये ते आघाडीवर असतात. या कामगिरीमुळे त्यांना सलग सातवेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याने मावळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

याबाबत बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, भारतीय लोकशाहीचा गाभारा असलेल्या सर्वोच्च सभागृहात अनेक महान नेत्यांनी योगदान दिले आहे. वैभवशाली परंपरा असलेल्या लोकसभेचे पीठासीन म्हणून कामकाज चालविण्याची संधी मिळणे, हे मी माझे भाग्य समजतो. सभागृहाच्या महान परंपरेचे वैभव व गरिमा अबाधित ठेवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. मावळच्या जनतेमुळेच मला या पदावर काम करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे मतदारांसह, तालिका अध्यक्षांच्या पॅनेलवर निवड केल्याबाबत लोकसभेच्या अध्यक्षांचे आणि शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो.

अधिक वाचा –
– भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा शिबीर संपन्न
– वाघेश्वर येथील प्राचीन शिवमंदिरात चोरी; संतप्त ग्रामस्थांची वडगाव मावळ पोलिसांत तक्रार
– तळेगाव स्टेशन तलावात तरुण बुडाला; आपदा मित्र आणि अग्निशमन दलाकडून तरुणाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न


dainik maval jahirat

Previous Post

गतिरोधकावरुन दुचाकी स्लीप झाल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

तळेगाव रोटरी क्लबच्या वतीने 488 विद्यार्थ्यांचे धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Tetanus-vaccination

तळेगाव रोटरी क्लबच्या वतीने 488 विद्यार्थ्यांचे धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.