व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तुंग किल्ल्यावर घसरून पडल्याने महिलेचा अपघात, सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांकडून तत्काळ मदत । Maval News

मावळातील किल्ले, लेण्या, धरणे आदी ठिकाणी गर्दी होत आहे. पर्यटकांनी सावधगिरी बाळगून पर्यटन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 22, 2024
in लोकल, ग्रामीण
Tung fort Maval Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या निसर्ग पर्यटनास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे धरतीने हिरवा शालू नेसला असून डोंगळांवरून कोसळणाऱ्या जलधारांमुळे अलौकिक निसर्ग सौंदर्य बहरले आहे. हे निसर्ग सौंदर्य पाहायला राज्यभरातून पर्यटक मावळ तालुक्यात येत आहेत. त्यामुळे मावळातील किल्ले, लेण्या, धरणे आदी ठिकाणी गर्दी होत आहे. पर्यटकांनी सावधगिरी बाळगून पर्यटन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. परंतु, अनेकदा पर्यटकांनी परिसराची माहिती नसल्याने छोटेमोठे अपघात घडत असतात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

रविवारी (दि. 21 जुलै) किल्ले तुंग येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या एका महिलेचा घसरून पडल्याने अपघात झाला. त्या महिलेला सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी तत्काळ मदत केली. तुंग किल्यावर मुंबईमधून काही पर्यटक किल्ला पाहण्यासाठी आले होते. त्यातील एक मुलगी बालेकिल्यावरून उतरताना पाय सरकून जोरदार पडली आणि तिचा पाय घोट्याजवळ संपूर्णपणे वाकडा झाला. किल्याच्या पायथ्याजवळ सह्याद्री प्रतिष्ठान मावळ तालुका यांच्या वतीने आपत्कालीन बोर्ड लावण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी आपत्कालीन नंबर तुंग किल्याबाबत देण्यात आले होते. त्याचा उपयोग या पर्यटकांनी केला. ( Accident of woman due to slip on Tung fort Maval Taluka )

त्यांनी सचिन शेडगे याना फोन केला. झालेल्या प्रसंगाबद्दल माहिती दिली आणि मदतीचे आवाहन केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ पायथ्या जवळ राहणारे सह्याद्रीचे दुर्गसेवक गुरु शेडगे, साईनाथ शेडगे, विलास शिंदे,अतुल पाठारे, शुभम हनमघर याना किल्यावर स्ट्रेचर घेऊन पाठवले आणि जखमी मुलीस सुखरूप प्राथमिक उपचार करून स्ट्रेचरवरून पायथ्याशी आणले. पुढील उपचारासाठी तिला दवाखान्यात पाठवून दिले.

काही महिन्यांपूर्वी घोरपडे प्रतिष्ठान मार्फत अशा स्ट्रेचर मावळ तालुक्यातील प्रत्येक किल्याला भेट म्हणून दिल्या होत्या. त्याचा फायदा आज प्रत्यक्षात झाला त्या मुळे अश्या प्रकारच्या स्ट्रेचर, व फर्स्ट ऍड किट च्या सोयी प्रत्येक किल्याच्या पायथ्याशी व्हाव्यात ही अपेक्षा व्यक्त केली आहे.

अधिक वाचा –
– पवना धरणात बुडून 28 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू
– मावळ तालुक्यात ७० टक्के भात लागवडी पूर्ण, पवन मावळ विभागात सर्वाधिक लावणी
– येळसे गावात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ‘पीक विमा पाठशाळा’ संपन्न, विमा कंपनी आणि कृषी विभागाकडून मार्गदर्शन


Previous Post

पवनानगर येथील संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये मातृपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी । Pavananagar News

Next Post

कामशेत येथील शिबिरात 71 जणांकडून रक्तदान, शंभराहून अधिक नागरिकांची रक्त तपासणी । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Blood donation Camp

कामशेत येथील शिबिरात 71 जणांकडून रक्तदान, शंभराहून अधिक नागरिकांची रक्त तपासणी । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

government sudden increase in gas cylinder prices is unfair Maval Taluka Congress statement

सरकारने गॅस सिलिंडरची अचानक केलेली दरवाढ अन्यायकारक ; मावळ तालुका काँग्रेसचे निवदेन

March 12, 2026
MLA Sunil Shelke attention in session regarding issues in Dehuroad Cantonment area

रेडझोनचा प्रश्न, शिक्षण – आरोग्य – पाण्याची समस्या ; देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील प्रश्नांबाबत आमदार सुनील शेळके यांची अधिवेशनात लक्षवेधी

March 12, 2026
Agriculture Minister Dattatreya Bharane

खत विक्रीत अनियमितता आढळल्यास दोषी विक्रेत्यांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेणार – कृषी मंत्री

March 12, 2026
Katkari community gets benefit of Rs 2 lakh 39 thousand from government for building house with toilet

शौचालय सहीत घरकुल बांधणीसाठी कातकरी समाजाला सरकारकडून मिळतो २ लाख ३९ हजार रुपयांचा लाभ

March 12, 2026
Renovation of classrooms at New English School in Vadgaon with Rs 31 lakh CSR fund from Astemo Fi Company

ॲस्टेमो फाय कंपनीच्या ३१ लाख सीएसआर निधीतून वडगावमधील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या वर्गखोल्यांचे नूतनीकरण

March 11, 2026
Hope for the Children Foundation honors accomplished women in social and administrative fields in Maval

‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मावळातील सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

March 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.