Accident on Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई लेनवर आज, सोमवार (दि. 25 मार्च) रोजी भीषण अपघात झाला. सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी मुंबई लेनवर किमी 36.300 येथे हा अपघात झाला. एका दुधाच्या टँकरवरील (नं GJ-18-BV 5559) चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टँकर एका कारवर (क्र MH-14-VQ -1072) उलटला आणि त्याच अवस्थेत घसरत जाऊन पुढे जाणाऱ्या कंटेनेरला (क्रमांक MH – 46 -BB-9309) धडकला. त्यामुळे कंटेनर देखील जागीच उलटला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
ह्या अपघातात कारमधील संकेत अतुल अग्रवाल (वय 29) आणि प्रतिक अतुल अग्रवाल (वय 34) दोघेही राहणार खराडी – पुणे हे आश्चर्यकारकरित्या बचावले. तर उलटलेल्या कंटेनर मधील चालक रितेश चांगदेव जगदाळे (वय 32 रा. मान – सातारा) हा देखील किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याची संपूर्ण माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. ( Accident on Mumbai Pune Expressway 1 Death On Spot )
अपघाताची माहिती मिळताच त्या ठिकाणी महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, बोरघाटचे अधिकारी व कर्मचारी, आय.आर.बी. पेट्रोलिंग टीम, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, आरटीओ अधिकारी, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान, मृत्युंजय देवदूत आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी मदतकार्य केले. टँकरमधील मृत चालकाचे शव खोपोली नगरपालिका रुग्णालयात आणण्यात आले आहे. अपघाताचे ठिकाणी खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांनी प्रत्यक्ष धाव घेऊन परिस्थिती हाताळली. बाधित वाहने बाजूला करुन काही वेळासाठी विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
अधिक वाचा –
– ‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, मुरलीधर मोहोळांचा घरोघरी जाऊन करणार प्रचार । Pune Lok Sabha Election 2024
– मावळ तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब वाघमारे यांना ‘कर्तव्य दक्ष पुरस्कार’ जाहीर । Vadgaon Maval
– खासदार श्रीरंग बारणे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी! बाळा भेगडे यांच्यानंतर मावळ लोकसभेसाठी भाजपाच्या ‘या’ नेत्याचे नाव पुढे । Maval Lok Sabha