Dainik Maval News : कार्ला येथे एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतत असताना एका भाविकाचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड ते निगडी दरम्यान असलेल्या जकात नाक्याजवळ घडली. एका दुचाकीच्या अपघातात दुचाकी वरील एकाचा मृत्यू झाला. मंगळवार (दि. 20 मे) रोजी रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली.
अमितकुमार बाळासाहेब गवळी (वय 34, रा. मोशी प्राधिकरण) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अमितकुमार यांचा लहान भाऊ अभिषेक बाळासाहेब गवळी यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमितकुमार आणि त्यांचा आतेभाऊ धनंजय ठोंबरे हे मंगळवारी कार्ला येथे एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना देहूरोड ते निगडी दरम्यान जकात नाक्याजवळ विरुद्ध दिशेने एक दुचाकी आली.
त्यामुळे अमितकुमार यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये अमितकुमार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर धनंजय ठोंबरे जखमी झाले. देहूरोड पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खरीप हंगाम तोंडावर, कृषी सहाय्यक संपावर ! बळीराजा आणि कृषी विभागातील संपर्क तुटला । Maval News
– तळेगाव आगारातून सुटणारी तळेगाव दाभाडे ते विलेपार्ले बस पुन्हा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade
– खादी ग्रामोद्योग संघ मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविणार । Maval News
– जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांकडून एकाला बेदम मारहाण ; आंबळे गावातील घटना । Maval News