शुक्रवारी (14 ऑक्टोबर) रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रक (क्र. टीएन 31बीबी 5730) हा खोपोली पोलीस स्टेशन ( Khopoli Police Station ) हद्दीतील किमी 39 येथे आला असता उतारावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने समोर जाणारी एक कार आणि ट्रकला धडक दिली. या अपघातात गाडी पलटी झाली आणि गाडीतील साबणाचे बॉक्स खाली पडले, त्याखाली अडकल्याने चालक रमेश (रा. तमिळनाडू) याचा मृत्यू झाला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तर, दुसरा अपघात या अपघातस्थळापासून केवळ एक किमी अंतरावर म्हणजे किमी 38.500 येथे पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पुणे मुंबई लेनवर झाला. यामध्ये ट्रक (क्र. टीएन 77 डी 9826) वरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने समोरील ट्रकला धडक दिली. यामध्ये चालक आनडूरोस अँथनी (रा. तमिळनाडू) हा केबिनमध्ये आडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर क्लिनर व्यंकट सुब्रमण्याम हा किरकोळ जखमी झाला आहे. ( Accident on Pune-Mumbai Expressway Two Deaths )
आयआरबी पेट्रोलिंग, बोरघाट महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी आणि लोकमान्य रुग्णसेवा या यंत्रणांनी दोन्ही घटनांमध्ये अपघातग्रस्तांना मदत केली.
अधिक वाचा –
भाजपाच्या आंदोलनाचा दणका! मावळचे सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांचे अखेर निलंबन