इंडो ॲथलेटिक्स सोसायटी अर्थात आयएएस तर्फे सर्व लांब पल्ल्याच्या सायकलस्वारांसाठी रविवारी (दि. 4) जुन्या मुंबई-पुणे महामार्गाशी संलग्न वडगाव मावळ शहरात मोफत मुक्काम व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात आले. देश-विदेशातील सायकल स्वार भारत भ्रमण करत असतात. अशा सायकल स्वारांना ठिकठिकाणी हक्काचे थांबे किंवा मुक्कामाची सोय नसते. परंतू ‘अतिथी देवो भव’ या संकल्पनेला अनुसरून आयएएस तर्फे वडगाव येथे सायकलपटूंसाठी हे विनामूल्य मुक्काम ठिकाण करण्यात आले आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे. इथे एकाचवेळी दहा सायकलपटूंना राहणे शक्य होणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘आयएएस’च्याही अनेक सायकलपटूंनी आजवर देशात ठिकठिकाणी सायकल भ्रमण केले. त्यावेळी त्यांना सायकलपटूंसाठीच्या मुक्कामाच्या जागेची उणीव प्रकर्षाने जाणवली. त्यातून बोध घेत ‘आयएएस’ संस्थेतर्फे भारत भ्रमण करणाऱ्या देश-विदेशांतील सायकलस्वरांसाठी आतापर्यंत दोनशेहून अधिक ठिकाणी मुक्कामासाठी सेवा मोफत पुरविण्यात आली आहे. वडगाव शहरातील माळीनगरच्या सद्गुरु मारुतीनाथ मंदिरामागे मोठी खोली असून तिथे ही निवास व्यवस्था केली आहे. ‘आयएएस’चे मुख्य सल्लागार अजय दरेकर, प्रमोद म्हाळसकर, सुनील चव्हाण यांनी वडगाव मावळ येथील या ठिकाणची संपूर्ण जबाबदारी उचलली आहे. ( Accommodation facility for cyclists at Vadgaon Maval by Indo Athletics Society )
अधिक वाचा –
– मावळ तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक : अवैध उमेदवारी अर्ज आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेबाबत महायुतीच्या नेत्यांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा
– ‘छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाची माफी मागावी अन्यथा राज्यभर निषेध करणार’, कुणी केलीये मागणी? काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर
– मावळमधील ‘या’ 10 गावात अंगणवाडी इमारतीसाठी निधी उपलब्ध; 11 अंगणवाड्यांसाठी तब्बल 1 कोटी 23 लाखांचा निधी, वाचा सविस्तर । Maval News