वडगाव मावळ भागातील उर्से हद्दीत असलेल्या दृतगती मार्गावर रेशनच्या 35 टन तांदळाची काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या दोन ट्रकवर शिरगाव-परंदवाडी पोलिसांनी कारवाई करून 4 आरोपींना अटक करत 27 लाख 62 हजार 437 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मंगळवार (दिनांक 20 जून) रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास उर्से (ता. मावळ जि. पुणे) हद्दीत पोलिसांनी ही कारवाई केली. वडगाव मावळ न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. रेशन धान्य काळाबाजार करणाऱ्या टोळीला जेरबंद केल्याने आणखी टोळ्या जेरबंद होण्याचा पोलिसांनी विश्वास व्यक्त केला. ( accused black marketers of ration grain arrested with 35 tonnes of grain shirgaon police took action )
राजु नागनाथ केंद्र (वय 32, रा. गोकुळनगर कात्रज पुणे), अमोल लक्ष्मण सोळसकर (वय 42, रा. रुहि, ता. कोरेगाव, जि. सातारा), सचिन वसंत धुमाळ (वय 32, रा. भाडळे, ता. कोरेगाव, जि. सातारा) व संजय शिवलिंग वाघोलीकर (वय 54, रा. फ्लॅट नं 20, ए विंग, हस्ती पुरम सोसायटी, बिबवेवाडी पुणे) अशी रेशन तांदूळ काळाबाजार करणाऱ्या पोलीस कोठडीतील आरोपींची नावे आहेत.
शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार उर्से हद्दीत द्रुतगती मार्गावरून सरकार मान्य धान्य बेकायदेशीर विक्री करता घेऊन जाणार आहेत अशी बातमी मिळाल्याने उर्से द्रुतगती मार्गावर सापळा रचुन सदर ठिकाणी दोन ट्रक धान्य व आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत.
हेही वाचा – गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला तळेगावातून रंगेहात अटक । Maval Crime News
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह. पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहा. पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता एस धुमाळ, पोलीस हवालदार तुकाराम साबळे, पोलीस नाईक समीर घाडगे, योगेश नागरगोजे, पोलीस अंमलदार समाधान फडतरे व दिलीप राठोड यांनी केली आहे.
अधिक वाचा –
– आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद, कुर्बानी न देण्याचा मुस्लीम समाजाचा निर्णय, वडगावकरांकडून स्वागत
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगर इथे मावळ विधानसभेतील भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांची टिफिन बैठक संपन्न