Dainik Maval News : मावळ तालुक्यातील धामणे गावात शुक्रवारी (दि. 4 एप्रिल) एक 73 वर्षीय वृद्धाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शिरगाव-परंदवडी पोलिसांनी मुख्य आरोपीस अटक केली असून हत्येच्या अवघ्या सहा तासात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. मंगेश किसन गराडे (वय 38, रा. धामणे ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पवन मावळ विभागातील धामणे गावात शुक्रवारी महादेव भगवान गराडे (वय 73) यांचा ग्रामपंचायत कार्यालयापाठीमागे गराडे तालीम जवळ खून करण्यात आला होता. आरोपीनी धारदार शस्त्राने गराडे यांच्यावर वार करीत त्यांची निर्घृणपणे हत्या केली होती. दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. तसेच घटनेनंतर आरोपीनी घटनास्थळावरून पळ काढला होता.
घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस उपायुक्त बाळासाहेब कोपनर, शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, पोलीस उप निरीक्षक प्रकाश पारखे आदी पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
घटनास्थळी पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला व पोलिसांनी तपासास सुरुवात केला. प्राथमिक माहितीच्या आधारे हा खून नात्यातीलच मंगेश किसन गराडे याने केल्याची माहिती समोर आली होती, जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याची शंका होती, त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांना गुंगारा देत असलेला आरोपी मंगेश गराडे याला पोलिसांनी आंबेठाण येथून ताब्यात घेतले.
पुढील तपास शिरगाव पोलीस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ( Accused in Dhamane murder case arrested nephew killed his uncle over a land dispute Maval Crime )
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number