Dainik Maval News : लोणावळा येथे मुंबई – पुणे द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या झोपड्यांवर शनिवारी (दि.22) आयआरबी आणि लोणावळा नगरपरिषद प्रशासन यांनी संयुक्त कारवाई करीत झोपडपट्टी हटविली.
- लोणावळा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच एक्सप्रेस हायवेच्या पुलाखाली १५ ते २० झोपड्यांमधून काही लोक राहत होते. हे सर्वजन कुठून आलेत, काय काम करतात याबाबत कुणालाही माहिती नव्हती. परंतु पुलाखाली त्यांचे राहणीमान असल्याने परसिरात आरोग्य, स्वच्छता आणि महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.
त्यामुळे महाविद्यालयाकडून अनेकदा नगरपरिषद, आयआरबी व रस्ते विकास महामंडळाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. नगरपरिषद आणि आयआरबी यांनीही यापूर्वी अनेकदा येथे कारवाई केली. परंतु सकाळी कारवाई झाल्यावर रात्री पुन्हा याठिकाणी झोपड्या टाकल्या जात होत्या. पूर्वी जिथे ४ ते ५ झोपड्या होत्या, तिथे आता १५ ते २० झोपड्या उभारण्यात आल्या.
अखेर शनिवारी सकाळीच लोणावळा नगर परिषदेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि आयआरबीचे पथक यांनी संयुक्तरित्या कारवाई करीत याठिकाणी असलेल्या सर्व झोपड्या काढून टाकल्या. त्यामुळे हा परिसर आता मोकळा श्वास घेत आहे. मात्र झोपड्या हटवल्यानंरही सदरची मंडळी तिथून गेली नसल्याने ते पुन्हा झोपड्या उभारण्याची शक्यता आहे. अशात प्रशासन काय पाऊल उचलणार, हे पाहावे लागेल.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश