Dainik Maval News : मावळ तालुक्यातील औंढे खुर्द ( जि. पुणे ) परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत तब्बल ७०० लिटर गावठी दारू आणि एक चारचाकी वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून जप्त मुद्देमाल एकूण किंमत ५ लाख ७४ हजार रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून, बेकायदेशीररीत्या गावठी दारूची वाहतूक व साठवणूक होत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्या अनुषंगाने सापळा रचून ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत ७०० लिटर गावठी दारू तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन (अंदाजे किंमत ₹५,००,०००/-) जप्त करण्यात आले. या प्रकरणी एकूण एक गुन्हा दाखल करण्यात आला असून तो वारस स्वरूपाचा असल्याची नोंद आहे. बेवारस प्रकरण नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क,विभागाचे अधिक्षक अतुल कानडे,उपअधिक्षक सुजित पाटील तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक उत्तम आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. याप्रकरणाचा तपास ए. एस. तांदळे दुय्यम निरीक्षक करत असून, कारवाईदरम्यान पी. जी. रुईकर (दुय्यम निरीक्षक), रोहिदास गायकवाड (जवान) आणि प्रदीप गवळी (जवान) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मावळ तालुक्यात बेकायदेशीर दारू निर्मिती व विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, परिसरात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे चित्र दिसत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी
– मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी विद्यमान तहसीलदार सहीत 11 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन
– 2028 पर्यंत पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम पूर्ण होणार ; रिंग रोड सह विविध रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर
– मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : नक्की काय कारवाई होणार? पाहा महसूलमंत्री बावनकुळे काय म्हणाले
