व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा ग्रामीण हद्दीत IPS सत्यसाई कार्तिक यांची मोठी कारवाई ; पाऊण कोटींचा मुद्देमाल जप्त, 10 जण ताब्यात

BREAKING : लोणावळा ग्रामीण हद्दीत IPS सत्यसाई कार्तिक यांची मोठी कारवाई ; पाऊण कोटींचा मुद्देमाल जप्त, 10 जण ताब्यात

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 14, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
लोणावळा ग्रामीण हद्दीत IPS सत्यसाई कार्तिक यांची मोठी कारवाई ; पाऊण कोटींचा मुद्देमाल जप्त, 10 जण ताब्यात

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकारल्यापासून अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरू ठेवली आहे. कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथे एका घरामध्ये अवैधरित्या जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सत्यसाई कार्तिक यांनी पथकासह सोमवारी रात्री त्याठिकाणी सापळा रचून छापा टाकला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी छापा टाकलेल्या ठिकाणी अनेकजण जुगार खेळताना रंगेहात सापडले. पोलिसांनी, राहुल भरत इंगुळकर (वय 34, रा. वाकसई शेजारी ता.मावळ), संतोष ज्ञानदेव बोत्रे (वय 36, रा. वेहेरगांव ता.मावळ), मंगेश विठ्ठल देशमुख (वय 46, रा.वेहेरगांव ता.मावळ), संजय विठ्ठल देशमुख (वय 43, रा.वेहेरगाव ता.मावळ), दिनेश पांडूरंग गायकवाड (वय 40, रा.वेहेरगाव ता.मावळ), चंद्रकांत हौजी देवकर (वय 42, रा.वेहेरगाव ता.मावळ), विनोद शरद नाणेकर (वय 42, रा.वेहेरगाव ता.मावळ), अजित सुनिल देवकर (वय 29, रा.वेहेरगाव ता.मावळ), मंगेश मारुती राणे (वय 40, रा.कामशेत ता.मावळ) संतोष काशिराम दळवी (वय 45, रा.वेहेरगाव ता.मावळ) यांना ताब्यात घेतले आहे. ( Action of IPS Sathyasai Karthik on gambling den in Lonavala Police limits 10 people detained )

तसेच, पंचासमक्ष पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची झडती घेतली असता यातील संतोष काशिराम दळवी (वय 45 वर्ष, रा. वेहेरगाव, ता.मावळ) याच्याजवळ 20 हजार 300 रुपये किमतीचे प्रतिबंधित अंमली पदार्थ आढळून आले असून त्याने हे अंमलीपदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे चौकशीत समोर आले. याबाबत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, लोणावळा ग्रामीण ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 5 एन.डी.पी.एस. 1985 चे कलम 8 (क) 21 (ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कारवाईमध्ये नमुद सर्व आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम, वाहने आणि इतर साधने असा एकूण 74 लाख 14 हजार 50 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि शेवते, पोसई शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नितेश (बंटी) कवडे, पोलीस हवालदार अंकुश नायकुडे पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे, पो.कॉ मंगेश मारकड यांच्या पथकाने केली आहे.

अधिक वाचा –
– तळेगाव शहरातील वाढती अस्वच्छता, पाणीपुरवठ्याचे ढिसाळ नियोजन आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे भाजपा आक्रमक
– महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांचे साखळी उपोषण ; देवेंद्र फडणवीसांच्या घरावर काढणार मोर्चा । Pune News
– ‘हर घर तिरंगा’ अभियान जनजागृतीसाठी पवनानगर येथे प्रभातफेरी ; विद्यार्थ्यांची भर पावसात तिरंगा रॅली । Pavananagar


Previous Post

खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ! पराभूत उमेदवाराकडून न्यायालयात याचिका दाखल, पुन्हा एकदा… । Maval Lok Sabha MP Shrirang Barne

Next Post

नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच ऐवजी पाच वर्षे ; राज्य सरकारचे अनेक मोठे निर्णय, वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra cabinet meeting decision

नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच ऐवजी पाच वर्षे ; राज्य सरकारचे अनेक मोठे निर्णय, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maharashtra Legislature Vidhan Bhavan

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करतील – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

March 5, 2026
Accident

भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू ; बधलवाडी – नवलाख उंबरे मार्गावरील घटना

March 5, 2026
10th standard exam In Maval taluka 7047 students solved Marathi paper SSC Exam 2025

इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

March 5, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee Chairman Sambhaji Shinde resigns

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा

March 5, 2026
Police take strong action against bullet kings in Vadgaon Maval city

वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई

March 5, 2026
Indian-Railway

पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर

March 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.