Dainik Maval News : संकल्प नशामुक्ती अभियानाचा एक भाग म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अंमली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कायदेशीर कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ हस्तगत केले आहेत.
शनिवारी (दि.21) रोजी मध्यरात्री कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लोणावळा भागातील कुसगाव बु. परिसरात राहणारे काही व्यक्ती त्यांच्या राहत्या घरातून गांजा व प्रतिबंधीत गुटखा त्यांच्या ओळखीच्या लोकांना विक्री करत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सत्यसाई कार्तिक यांनी रात्रीपासून भैरवनाथनगर परिसरात त्यांच्या पथकासह सापळा रचला होता.
मिळालेल्या बातमीप्रमाणे शनिवारी (दि.21) रोजी मध्यरात्री सुमारास भैरवनाथनगर, कुसगाव बु. येथे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी पंचासमक्ष छापा टाकला असता सदर ठिकाणी 3 व्यक्ती मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्यावरील संशय बळावला. पोलीस पथकाने जागेवरच पंचांसमक्ष नमूद व्यक्तींच्या ताब्यातील चारचाकी गाडी, घर झडतीमध्ये 737 ग्रॅम गांजा व नमुद व्यक्तींच्या ताब्यात असलेल्या चारचाकी वाहनामध्ये 128 पुडे विमल पान मसाला प्रतिबंधित गुटखा मिळुन आला. सदर कारवाईमध्ये गांजा, प्रतिबंधीत विमल पान मसाला गुटखा व चारचाकी वाहन असा एकुण 3 लाख 27 हजार 137 रूपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आला आहे.
या कारवाईत 1)आब्बास तपषिर खान उर्फ अरबाज (वय 21) 2) आवान आब्बास तपषिर खान उर्फ मुन्ना (वय 19 वर्षे) दोघेही रा. भैरवनाथनगर, कुसगाव बु. (ता. मावळ जि. पुणे ) 3) अश्विन चंद्रकांत शिंदे (वय 38 वर्षे) रा. कुसगाव बु. (ता. मावळ) यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात पोहवा सिताराम बोकड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पो.स्टे. येथे एनडीपीएस व इतर विविध कलमा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पो.स्टे चे सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे हे करत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– रानडुक्कराची शिकार करून मांस वाहतूक करणाऱ्या पाच जणांना अटक, वडगाव मावळ वनविभागाची कारवाई । Maval News
– वेहेरगाव तलावात बुडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू, शिवदुर्ग रेस्कू टीमला मृतदेह शोधण्यात यश । Karla News
– तालुकास्तरीय किल्ले बनवा स्पर्धेत कान्हे शाळेच्या ‘शिवनेरी’ किल्ल्याला द्वितीय मानांकन । Maval News