व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आदित्य ठाकरे यांची तळेगावमधील धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट । Talegaon Dabhade

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आज, रविवार (दि. 21) मावळ लोकसभेच्या दौऱ्यावर आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 21, 2024
in लोकल, शहर
Aditya-Thackeray-talegaon-dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज, रविवार (दि. 21) मावळ लोकसभेच्या (Maval Loksabha) दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांची तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे स्वागत सभा झाली. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी तळेगाव दाभाडे शहरातील नामांकित पतसंस्था असलेल्या धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. संस्थेचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त ठाकरेंनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांचे स्वागत आणि सन्मान केला. पतसंस्थेचे संस्थापक खंडूजी टकले, अध्यक्ष विनोद टकले, सचिव संजय शिंदे, खजिनदार सुधीर खांबेटे यांच्या हस्ते आदित्य ठाकरेंचा सत्कार करण्यात आला. आदित्य ठाकरेंनी पतसंस्थेच्या कामकाजाचे कौतूक केले आणि पतसंस्थेची अशीच प्रगती होत राहो, अशा शुभेच्छा दिल्या. पतसंस्थेचे सर्व संचालक विजय शेटे, संतोष परदेशी, दत्तात्रय शिंदे, केशव कुल, किरण किल्लावाला, आदित्य टकले, संकेत खळदे, दत्तात्रय साळुंखे, कर्मचारी वर्ग आणि दै. बचत प्रतिनिधी हेही यावेळी उपस्थित होते. ( Aditya Thackeray visit to Dharmaveer Sambhaji Nagri Sahakari Patsanstha )

तसेच, सदर कार्यक्रमाला पुणे जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सचिन आहिर, मावळ विधानसभा संपर्क प्रमुख प्रभाकर पवार, मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, उप जिल्हा प्रमुख सुरेश गायकवाड, लोणावळा शहर संघटक साधना चौधरी, समन्वय प्रमुख रमेश जाधव, लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, तळेगाव शहर प्रमुख शंकर भेगडे, महिला पुणे जिल्हा प्रमुख शैलजा खंडागळे, महिला तळेगाव शहर प्रमुख संगीता सोनवणे, तळेगाव शहर कार्याध्यक्ष सतिश गरुड आणि मावळ तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांची ‘उमेद’ वाढवण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज – आमदार सुनिल शेळके । Maval News
– खासदार श्रीरंग बारणे यांनी केली मोरया गोसावी मंदिर परिसराची स्वच्छता । MP Shrirang Barne
– पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, 14 फेऱ्या रद्द, लगेच पाहा वेळापत्रक । Mega block on Pune Lonavala Railway Route


dainik maval jahirat

Previous Post

अवघी कामशेत नगरी झाली राममय… प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणूकीत हजारो रामभक्तांची उपस्थिती । Maval News

Next Post

आंघोळीला पाणी दिले नाही म्हणून पत्नीला बेदम मारहाण, पाहा कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार । Crime News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Domestic-Violence-beating-Harassment

आंघोळीला पाणी दिले नाही म्हणून पत्नीला बेदम मारहाण, पाहा कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार । Crime News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.