Dainik Maval News : देशभरातील कोट्यवधी वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र देहूगाव येथील इंद्रायणी नदी घाट विकास प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. यामुळे देहूतील इंद्रायणी नदी घाट अधिक सुंदर व आकर्षक तसेच भाविकांसाठी सुसज्ज होणार आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या पुढाकारातून देहूतील कापूर ओढा ते जगतगुरू तुकाराम महाराज मंदिर या परिसरातील घाट विकासासाठी 19.98 कोटी रुपयांच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सध्या या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ठेकेदाराला कार्यारंभ आदेश जारी करण्यात आला आहे.
प्रकल्पासाठी व्यवस्थापन सल्लागार नियुक्ती प्रक्रियेचा पुढील टप्पा सुरू असल्याची माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली आहे. दरम्यान हा प्रकल्प इंद्रायणी नदीच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच भाविक आणि पर्यटकांसाठी अधिक सुंदर आणि सुलभ अनुभव निर्माण करणार आहे, असे पीएमआरडीएकडून कळविण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा ; शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा – आमदार सुनिल शेळके
– मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News
– मोठी बातमी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड ; चुरशीची लढतीत 63 मतांनी विजयी । Dehu News