एकनाथ शिंदे सरकारकडून महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर करण्यात आली आहे. यात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थमंत्रीपदासह आपल्याकडे पुण्याचे पालमंत्री पद देखील खेचले आहे. राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (बुधवार, दिनांक 4 ऑक्टोबर) जाहीर केली. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सुधारित 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :
- पुणे – अजित पवार
- अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील
- सोलापूर – चंद्रकांत दादा पाटील
- अमरावती – चंद्रकांत दादा पाटील
- वर्धा – सुधीर मुनगंटीवार
- भंडारा – विजयकुमार गावित
- बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील
- कोल्हापूर – हसन मुश्रीफ
- गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम
- बीड – धनंजय मुंडे
- परभणी – संजय बनसोडे
- नंदूरबार – अनिल भा. पाटील
( Ajit Pawar Became Guardian Minister of Pune District Eknath Shinde announced revised list of Guardian Ministers of 12 districts )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘जे घरात बसलेत त्यांनी शहरवासीयांना उत्तर द्यावं’, तळेगावच्या मुख्याधिकाऱ्यांवरुन ‘आण्णांचा’ ‘आप्पांवर’ हल्लाबोल
– तिकोणा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वप्नील तुपे यांची बिनविरोध निवड । Gram Panchayat Election
– दिनांक 16 ऑक्टोबरला फॉर्म भरायला सुरुवात ते 6 नोव्हेंबरला मतमोजणी! वाचा ग्रामपंचायत निवडणूकांची संपूर्ण कार्यक्रमपत्रिका